एमजीए फाँऊडेशन
आयोजित
इनडोअर क्रिकेट
स्पर्धा २९ जून ला मुंबईत
मुंबई : एमजीए फाउंडेशनतर्फे मुंबई इनडोअर क्रिकेट
स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य इनडोअर
क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर रेल्वे
स्थानकाजवळील सन्टेक टर्फ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत दोन टर्फवर खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून त्यांचे ४-४ चे दोन गट करण्यात आले
आहेत. प्रत्येक संघ गटातील इतर तीन संघांविरुद्ध राऊंड-रॉबिन फॉरमॅटने सामने
खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि नंतर उपांत्य
विजेते संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येऊन विजेतेपदासाठी लढतील.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड, कोटक बँक, होम स्क्वेअर प्रॉपर्टीज एलएलपी, वेल्थ अँड
बियॉन्ड, चाणक्य एंटरप्रायझेस, महावीर मल्टिस्पेशालिटी क्लिनिक यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांनी प्रायोजकत्व आणि सहकार्य दिले आहे असे एमजीए फाँडेशनचे
अधिकृत प्रतिनिधी मनीष अग्रवाल व स्नेहा पाटील यांनी या स्पर्धेची माहिती दिली.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला रु २१०००/- व चषक
तर उपविजेत्या संघाला रु ११०००/- व चषक एमजीए
फाँडेशनतर्फे देऊन गौरवण्यात येणार आहे. उर्वरित सर्व सहभागी संघांना रु. ५०००/- चे
व्हाऊचर देऊन गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत टीडीएस किंगस, टॅक्स टायटंस, आयटीआर वॉरीअर्स, रिटर्न
मेकर्स, ऑडीट आर्मी, मनी मास्टर्स, जीएसटी ग्लॅडीएटर्स, इगल लेजर्स हे संघ सहभागी
होत आहेत.
Post a Comment
0 Comments