कुमार – मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०२५-२६
ओम साईश्वर सेवा मंडळाचा दुहेरी विजयाचा जल्लोष!
ओम साईश्वरचे मुलींमध्ये यशस्वी कदम तर मुलांमध्ये अधिराज गुरव सर्वोत्कृष्ट
चुरशीच्या लढतीत ओम साईश्वरने दोन्ही मुकुट पटकावले
मुंबई, (क्री. प्र.), मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने इन्स्पायर फाऊंडेशन आयोजित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुरस्कृत कुमार–मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा केशवराव दाते क्रीडांगण, आगाशे पथ, दादर (प.) येथे अत्यंत थरारक आणि रोमहर्षक लढतींच्या साक्षीने या स्पर्धेचा समारोप झाला. दोन्ही गटात ओम साईश्वर सेवा मंडळाने पहिल्यांदाच दुहेरी मुकुट पटकावत इतिहास रचला. अंतिम फेरीच्या थरारक व धमाकेदार सामन्यांमुळे प्रेक्षकांनी रोमांच अनुभवला. कुमार-मुली दोन्ही गटात ओम साईश्वर सेवा मंडळाने पहिल्यांदाच दुहेरी मुकुट मिळवत व शानदार विजय साजरे करत जिल्हा अजिंक्यपदावर सुवर्णाक्षरात नाव कोरले. ओम साईश्वर सेवा मंडळाचे हे मुलींचे तिसरे तर कुमारांचे पहिले अजिंक्यपद ठरले. यापूर्वी कुमारांमध्ये दोनवेळा त्यांना उपअजिंक्यपदावर समाधान मानावे लागले होते.
स्पर्धेतील उत्कृष्ठ
खेळाडू :
कुमार मुली
अष्टपैलू
खेळाडू :- अधिराज गुरव (ओम साईश्वर) यशस्वी कदम (ओम साईश्वर)
उत्कृष्ट
संरक्षक :- निषाद ताम्हणकर (ओम साईश्वर) कादंबरी
तेरवणकर(ओम साईश्वर)
उत्कृष्ट
आक्रमक :- रोहन खांबे (सरस्वती) आरुषी गुप्ता (शिवनेरी)

Post a Comment
0 Comments