"मल्लखांबातून घडतो सर्वांगीण विकास — डॉ. तेजानंद
गणपत्ये"
कसरतींमुळे मन-मेंदू-पेशींना चालना;
२२ जिल्ह्यांतील ५५०
खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग — ४१ वी राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा डेरवण येथे
सुरू
डेरवण : भारतीय पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा अभिमान असलेल्या
मल्लखांबावरील कसरतींमुळे खेळाडूंच्या शारीरिक विकासासोबतच बौद्धिक क्षमताही
वृद्धिंगत होते. मन, मेंदू आणि मनगट सशक्त होत असल्याने खेळाडूंचा सर्वांगीण
विकास साधला जातो. आज उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयी-सुविधांचा योग्य वापर करून
खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवावे आणि
मल्लखांबासारख्या भारतीय खेळाला ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावावा, असे प्रेरणादायी मत ऑलिंपिकवीर सायकलपटू
डॉ. तेजानंद गणपत्ये
यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र हौशी मलखांब संघटना, रत्नागिरी
जिल्हा मल्लखांब संघटना आणि एस.व्ही.जे.सी.टी. स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त
विद्यमाने डेरवण क्रीडा संकुलात ४१ वी मिनी, सब-ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर गट राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा
भव्य दिमाखात सुरू झाली आहे. उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ. गणपत्ये,
तर अतिथी म्हणून श्रीकांत पराडकर, सचिन मांडवकर, शरयू यशवंतराव, महाराष्ट्र मल्लखांब संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष डोंगरे,
सचिव श्रेयस मस्कर
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील अंदाजे ५५० खेळाडूंचा सहभाग
असून मुला-मुलींच्या एकूण ८ वयोगटांत सामने रंगणार आहेत. येथून राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची
निवड होणार असल्याने खेळाडूंमध्ये विशेष उत्साह आणि जिंकण्याची जिद्द पाहायला मिळत
आहे.
उद्घाटन प्रसंगी एस.व्ही.जे.सी.टी. स्कूलच्या संचालिका शरयू यशवंतराव
आणि पाग व्यायाम शाळेचे अध्यक्ष विजय चितळे
यांनी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समारंभाचे
सुत्रसंचालन निलेश गोयथळे यांनी केले.

Post a Comment
0 Comments