मातीच्या मैदानातून फुलले कमळ – सोनाली शिंगटे !
“मेहनती मुलीचे कबड्डी स्वप्न साकार… महाराष्ट्राच्या रेडरचा
जगभरात आवाज़ — लोअर-परळच्या चाळीतून देशासाठी सुवर्णपदकांपर्यंत सोनालीची झेप” –
बाळ तोरसकर
मुंबई : ‘आंतरराष्ट्रीय मैदानी सातत्याने चमक दाखवणे’ हाच आहे सोनाली विष्णु शिंगटे हिच्या
यशाचा धागा. २७ मे १९९५ रोजी मुंबईतल्या लोअर-परळच्या गिरणी कामगारांच्या चाळीत
जन्मलेल्या सोनालीने गरिबी, संघर्ष,
संघर्षातून पुन्हा उभे राहण्याची जिद्द यांना आधार करून आज भारतीय
महिला कबड्डी विश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. साध्या घरात वाढलेली सोनाली
शिंगटे ही आजच्या भारतीय महिला कबड्डीतील चमकदार तारका आहे.
शूज घेण्यालादेखील पैसे नसतानाच्या जगण्यातून सोनाली
मैदानावर उभी राहिली तीकष्ट, फोकस
आणि विश्वास यांच्या आधारावर. सुरुवातीला क्रिकेटची आवड; पण
खर्चिक साधनसामग्री परवडत नसल्याने तिने मार्ग बदलला आणि कबड्डीकडे वळताच तिच्या
आयुष्याचा निर्णायक अध्याय सुरू झाला.
स्थानिक शिव शक्ती महिला संघात छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक
राजेश पाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पायाभरणी झाली. पायांना वजन बांधून धावणे,
रोजच्या सरावात स्वत:ला मर्यादेबाहेर नेणे, स्नायूंना
स्टीलसारखे लोखंडी करणे हेच तिचे जीवन बनले. तिचा कबड्डीचा प्रवास रोजच्या
धावपळीपासून चालू झाला आणि या खेळाने तिचे जीवन बदलले.
२०१४ मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे
प्रतिनिधित्व करताना संघाने क्वार्टर फायनलपर्यंत प्रवास केला. पुढच्या वर्षी, तिने कप्तान म्हणून संघाचे नेतृत्व करताना
संघाला फायनलपर्यंत नेले. या कामगिरीने तिला फक्त कौतुकच नव्हे, तर मान देखील मिळवून दिली. पुढे २०१५ मध्ये रेल्वेमध्ये नोकरी मिळवली आणि
संघासोबत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये झळकू लागली. तिच्या रेडर म्हणून केलेल्या
उत्कृष्ट कामगिरीतून ६४ वी, ६६ वी, ६७ वी राष्ट्रीय कबड्डी मध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके
मिळाली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचे क्रीडा करियर अतिशय उत्कृष्ट आहे.
२०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य आणि २०१९ मध्ये दक्षिण आशियाई
खेळांत सुवर्ण या दोन्ही वेळा भारताची रेडर व कटीबद्ध खेळाडू म्हणून तिने देशाचा
मान वाढवला.
तिची विशिष्टता - मैदानातला “ बोनस एक्सपर्ट ”
सोनाली फक्त रेडर म्हणूनच नव्हे; तर “बोनस पॉइंट्स” घेण्याच्या कौशल्यामुळे ती
आपल्या संघासाठी कठीण क्षणीही अतिरिक्त गुण मिळवण्यात एक्स्पर्ट आहे. या तिच्या
धाडशी व तांत्रिक जोड देण्याच्या कलेमुळेच ती सर्व प्रशिक्षकांची लाडकी ठरते. त्याचबरोबर तिची उंची आणि शारीरिक ताकद यांचा
संगम मैदानात तिच्यातील आत्मविश्वासात अजूनच ठळकपणे दिसतो.
पुढच्या काही वर्षांत तिने चिकाटी,
आत्मविश्वास आणि बळ याच्या जोरावर आपले नाव कबड्डी
क्षितिजावर कोरले. उपकर्णधार म्हणून टीमचे नेतृत्व केले आणि तिच्या नेतृत्त्वाखाली,
भारताने आशियाई महिला कबड्डी स्पर्धा जिंकली.
तिने आपल्या महाराष्ट्राच्या युवकांसाठी हा अभिमानाचा क्षण
घडवला. या यशाबदधल महाराष्ट्र शासनाने देखील तिचा गौरव केला राज्यातील सर्वोच्च
क्रीडा पुरस्कार शिव छत्रपती पुरस्कार देऊन तिला गौरवण्यात आले.
पुढील वाटचाल - कबड्डीची नवी दिशा
सोनाली शिंगटेचे स्वप्न खूप मोठे आहे. केवळ पदके जिंकणे
नाही, तर महिला कबड्डीसाठी व्यावसायिक लीग स्थापन
व्हावी असे तिला वाटते, जिथे महाराष्ट्र-उत्तर
प्रदेश-तमिळनाडूच नव्हे तर संपूर्ण भारतातील मुली खेळू शकतील, चमकतील. ज्याप्रमाणे पुरुषांच्या प्रो कबड्डी लीगने कबड्डीला नवा उजाळा
दिला, तसेच
महिलांसाठी सुध्दा असाच उजाळा मिळेल.
का आहे सोनालीचे यश प्रेरणादायी?
गरिबीतून उंचीवर:
आर्थिक अडचणींनीवर
मात करत प्रारंभ, आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशस्वीर प्रवास.
मेहनत + चिकाटी:
रात्री अभ्यास,
दिवसात सराव दोन हातांनी ‘स्वप्न + परिश्रम’ हे सूत्र
स्वीकारले.
टीम प्लेअर व
रेडर: संघासाठी जेव्हा गरज असते,
तेव्हा रेडर म्हणून गुण मिळवणे हे सोनालीचे कौशल्य!


Post a Comment
0 Comments