धी. युनायटेड
स्पोर्ट्स क्लब आयोजित कै. जे. पी. कोळी निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा
महिलांमध्ये कोपराखैराणेच्या ज्ञानविकास स्पो. फाऊंडेशनचा
तर
पुरुषांमध्ये बांद्रयाच्या शिर्सेकर महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीचा
डंका
ठाणे ५
डिसें : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व दि ॲमंच्यूअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या
मान्यतेने आणि धी. युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या भव्य आयोजनाखाली श्री दत्त जयंती उत्सव २०२५
निमित्त सुरू झालेल्या कै. जे. पी. कोळी निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो
स्पर्धेत महिलांमध्ये कोपरखैराणेच्या ज्ञानविकास फाऊंडेशनने तर पुरुषांमध्ये बांद्रयाच्या
शिर्सेकर महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीने विजेतेपद मिळवत विभागीय चषकावर नाव कोरले.
महिलांच्या अंतिम सामन्यात कोपरखैराणेच्या ज्ञानविकास
स्पोर्टस फाऊंडेशनने कोपरखैराणेच्याच रा. फ. नाईकचा ११-९ (मध्यंतर ६-४) असा २
गुणांनी विजय साजरा केला. या सामन्यात ज्ञानविकासने मध्यंतराला घेतलेली २
गुणांची आघाडीच त्यांना विजेतेपद देऊन गेली. ज्ञानविकासच्या दिव्या गायकवाड
(२, ३.४० मि. संरक्षण व २ गुण), श्रावणी घाडगे (नाबाद १.४०, २ मि. संरक्षण), कल्याणी कंक (२.२० मि. संरक्षण व १ गुण), पायल भगणे (३ मि. संरक्षण व ५ गुण), श्रावणी मोरे (२.१० मि. संरक्षण)
व प्रांजल पोर्टे (२ गुण) यांनी विजयाची
पायाभरणी करत प्रतिस्पर्धी रा. फ. नाईकला शेवटपर्यंत डोके वर काढूच दिले नाही. तर पराभूत रा. फ.
नाईकच्या साक्षी तोरणे (१.५०, ३.५० मि. संरक्षण व २ गुण), सिद्धी नागिमे
(२.३०, २ मि. संरक्षण), शितल थोर
(१.२०, १ मि. संरक्षण व १ गुण), गौरी रोडे (१ मि. संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार व दिलेली कडवी लढत अपयशी
ठरली.
पुरुषांच्या अंतिम
सामन्यात बांद्रयाच्या शिर्सेकर
महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीने कोपरखैराणेच्या ग्रिफिन जिमखान्याचा १५-१३ (मध्यंतर ८-६) असा २ गुणांनी पराभव केला. शिर्सेकर
महात्मा गांधीच्या हर्षद हातनकर (२.२०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), अर्पित
तिवारी (१, २ मि. संरक्षण व २ गुण), ओमकार सोनावडे (२.१०, १.५० मि. संरक्षण व २ गुण), प्रतिक
देवरे (२, १ मि. संरक्षण), ऋषिकेश मुर्चावडे (१, १.१० मि. संरक्षण व १ गुण), अनिकेत पोटे
व अर्जुन अनिवसे (प्रत्येकी ४ गुण) यांनी विजयात मोठा वाटा उचलला तर पराभूत ग्रिफिनच्या
निखील वाघ (२.१०, १.३० मि. संरक्षण व २ गुण), रुपेश
कोंदाळकर (२.४० मि. संरक्षण व १ गुण), सिद्धेश चिकने (२ मि. संरक्षण व २
गुण) सुरुवातीपासून चुरशीच्या वातावरणात खेळणाऱ्या दोन्ही संघांनी प्रेक्षकांची
मने जिंकली, परंतु मध्यंतरापर्यंत मिळवलेली दोन गुणांची
आघाडी महात्मा गांधी साठी सुवर्णमूल्याची
ठरली.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पुरुषांमध्ये श्री समर्थ
व्यायाम मंदिरने ज्ञानविकास स्पो. फाऊंडेशचा १६-१५ असा १ गुणाने पराभव केला.
तर महिलांमध्ये बदलापूरच्या शिवभक्त क्रीडा मंडळाने यजमान युनायटेड स्पो. क्लबचा ९-६ असा एक डाव राखून ३ गुणांनी परभव केला.
स्पर्धेतील उत्कृष्ठ
खेळाडू :
पुरुष महिला
अष्टपैलू
खेळाडू :- प्रतिक देवारे (महात्मा गांधी) दिव्या गायकवाड (ज्ञानविकास)
उत्कृष्ट
संरक्षक :- निखील वाघ (महात्मा
गांधी) सिद्धी नागिमे (रा. फ. नाईक)
उत्कृष्ट
आक्रमक :- अर्जुन
अनिवसे (महात्मा
गांधी) कल्याणी कंक (ज्ञानविकास)
मालिकावीर : ओमकार सोनवडे (ग्रिफिन) पायाल
भणगे (ज्ञानविकास)
समारोप व पारितोषिक वितरण समारंभ
मा. संदीप
माने (निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपायुक्त सुबोध ठाणेकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव व स्पर्धा
निरीक्षक बाळासाहेब
(बाळ) तोरसकर, विश्वस्त अध्यक्ष दत्तात्रय ठाणेकर, विश्वस्त आयोजक हेमंत
कोळी, भूषण कोळी, ऋतुराज ठाणेकर, दीपेश तांडेल, राहुल ठाणेकर, अरविंद ठाणेकर, विजय नाखवा, मंदार कोळी (सचिव दि अम्यॅच्यूअर खो खो असोसिएशन ठाणे ज़िल्हा), ओंकार भरत चव्हाण, हेमंत पमनानी, राजेश वायाळ, सुचित्रा भोईर,सारंग कदम तसेच खेळाडू, कार्यकर्ते व प्रचंड उत्साहाने
उपस्थित प्रेक्षकांची गौरवशाली उपस्थिती लाभली.


Post a Comment
0 Comments