लिटिल स्टार इंग्लिश हायस्कूलच्या ३०व्या वार्षिक क्रीडा
स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा जल्लोष
वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानावर धावणे,
बटाटा शर्यत,
स्किपिंग,
शॉटपुट,
खो-खो,
कबड्डी आदी स्पर्धांत
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव
मुंबई : लिटल स्टार इंग्लिश हायस्कूल,
वरळी
यांच्या ३०व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ
४ डिसेंबर २०२५ रोजी वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानावर मोठ्या उत्साहात आणि दणदणीत टाळ्यांच्या गजरात पार पडला.
समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून पूर्व उपमहापौर आणि पूर्व नगरसेविका सौ. हेमांगी वरळीकर
मॅडम,
तर विशेष अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार श्री. नवनाथ दांडेकर सर
उपस्थित होते.
या समारंभात मुख्य अतिथी श्री. निलिन सालवी – सचिव,
आदर्श नगर सेवा समिति,
श्री. संजय नागदा – ट्रस्टी,
श्री. सुनील कारवडे – कोषाध्यक्ष,
सौ. रीना मुदलियार –
मुख्याध्यापिका, लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूल,
श्री. नरेंद्र शिर्के –
मुख्याध्यापक, बालविकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा,
श्री. दिपक कायंदेकर – पत्रकार व
समाजसेवक आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. पालक-शिक्षक संघटनेचे सदस्य आणि मोठ्या
संख्येने पालक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढली.
विविध स्पर्धांचा रंगतदार मेळा
समारंभात धावणे, बटाटा शर्यत, स्किपिंग, शॉट पुट, टुग ऑफ वॉर, लांगडी, खो-खो आणि कबड्डी यांसारख्या व्यक्तिगतरित्या व गट स्तरावर विविध क्रिडा
स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी जोश,
आत्मविश्वास आणि कौशल्याची चमक दाखवत उत्साहाने सहभाग
नोंदविला.
विजेत्यांचा सन्मान
मुख्य अतिथी आणि विशेष अतिथींनी विविध स्पर्धांमध्ये विजयी
ठरलेल्या विद्यार्थ्यांना पदके, प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करून त्यांचे मनःपूर्वक
अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेचे आणि मेहनतीचे कौतुक करत सर्व
मान्यवरांनी उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी संदेश दिले.
शाळेच्या संकल्पाचे दर्शन
या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासासाठी शाळेने घेतलेली मेहनत आणि क्रीडा व पाठ्यक्रमाबाहेरील उपक्रमांना चालना देण्याची
शाळेची बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे अधोरेखित झाले.
उत्साह, स्पर्धा आणि यशाचा अविस्मरणीय सोहळा
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहकार्यामुळे क्रीडा स्पर्धा
अविस्मरणीय ठरली. विजयाचा जल्लोष, कौतुकाची थाप आणि आत्मविश्वासाचा झरा उडवत
लिटल स्टार इंग्लिश हायस्कूल
यांनी पुन्हा एकदा उत्कृष्टतेची छाप पाडली.

Post a Comment
0 Comments