५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
पहिल्याच दिवशी यजमान अहिल्यानगरचा दमदार विजय!
स्पर्धेत ठाणे, धाराशिव, सोलापूर, मुंबई उपनगर,
रत्नागिरी चमकले
मैथिली, समृद्धी, कल्याणी, अक्षरा
ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
अहिल्यानगर (क्री. प्र.) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या
मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी
कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी साखळी
सामन्यांत दमदार कामगिरीची आतषबाजी पाहायला मिळाली. मुलांमध्ये यजमान अहिल्यानगर
व छत्रपती संभाजीनगर तर मुलींच्या गटात मुंबई उपनगर यांनी प्रभावी
विजयांसह पुढे चाल केली.
मा. श्री. अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठाण, विश्वंभरा प्रतिष्ठाण बुऱ्हाणनगर व
बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत २४
जिल्ह्यांतील मुला-मुलींचे संघ सहभागासाठी उपस्थित असून ४ ते ७ डिसेंबरपर्यंत
सामने रंगणार आहेत.
मुलींच्या गटात बलाढ्य धाराशीवने परभणीवर १ डाव ३ गुणांनी
विजय संपादन केला. धाराशिव संघाकडून मैथिलीने ४ मिनिट १० सेकंद संरक्षण केले.
सांगलीने बीडवर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. सांगली संघाकडून स्वप्नाली तामखडे
आणि श्रेया तामखडे यांनी प्रत्येकी ३ मिनिट संरक्षण केले. सोलापूरने लातूरवर १ डाव
९ गुण राखत विजय मिळवला. सोलापूर कडून समृद्धी सुरवसेने नाबाद तीन मिनिट 20 सेकंद
पळतीचा खेळ केला तर कल्याणी लांबकाणेने ४ मिनिट ४० सेकंद पळतीचा खेळ करून आक्रमणात
४ गडी बाद केले. ठाणे संघाने सिंधुदुर्गवर २४ गुणांनी विजय संपादन केला. ठाणे
संघाकडून दीक्षा काटेकर हे ३ मिनिट 20 सेकंद तर प्रणिती जगदाळे यांनी ३ मिनिट
संरक्षण केले. अक्षरा भोसलेने आक्रमणामध्ये ७ गडी बाद केले. मुंबई उपनगर संघाने
नांदेड वर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. उपनगर संघाकडून दिव्या चव्हाणने ३ मिनिटे
तर दिव्या गायकवाड ने ४ मिनिट १० सेकंद पळतीचा खेळ केला. तर रत्नागिरीने जालना
संघावर १ डाव ९ गुणांनी (१६-७) मोठा विजय
मिळवला.
पहिल्या दिवशी झालेल्या किशोरांच्या (मुलांच्या) गटातील
सामन्यात धाराशिवने १ डाव ६ गुणांनी पालघरवर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सांगली
संघाने छत्रपती संभाजी नगरचा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. सोलापूरने सिंधुदुर्गवर
१ डाव 21 गुणांनी विजय संपादन केला. पुणे संघाने लातूरचा १ डाव 16 गुणांनी पराभव
केला. यजमान अहिल्यानगर संघाने परभणीवर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला. तर बलाढ्य
ठाणे संघाने हिंगोलीवर १ डाव 18 गुणांनी मात केली. नाशिकच्या संघाने जळगाव वर १
डाव ९ गुणांनी विजय मिळवला.



Post a Comment
0 Comments