‘श्री उद्यानगणेश मंदिर’ शालेय कबड्डी स्पर्धेचा थरार १५
डिसेंबरपासून दादरमध्ये
मुंबई व ठाण्यातील १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या ४८ शालेय
संघांचा सहभाग प्रवेश विनामूल्य,
रोख पारितोषिकांसह
वैयक्तिक गौरव पुरस्कारांची मेजवानी
मुंबई : मराठमोळ्या परंपरेचे प्रतीक आणि संघर्षशील खेळ
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कबड्डीच्या लोकप्रियतेला नवी उंची देत
श्री उद्यानगणेश मंदिर सेवा
समितीतर्फे आयोजित ‘श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धा’
१५ व १६ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,
दादर (पश्चिम)
येथे भव्य स्वरूपात रंगणार आहे. शालेय स्तरावर खेळाडूंना
प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित ही स्पर्धा १७ वर्षे व ५५ किलो वजनाखालील इयत्ता दहावीपर्यंतच्या
मुला-मुलींसाठी खुली आहे.
या स्पर्धेला मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रचंड उत्साहपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा असून
३२ मुलांच्या आणि १६ मुलींच्या
शालेय कबड्डी संघांना ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे,
ही स्पर्धा विनाशुल्क प्रवेशाची आहे. सहभागींच्या प्रोत्साहनासाठी प्रत्येक खेळाडूला
विनामूल्य कबड्डी टी-शर्ट
तसेच अल्पोपहार दिला जाणार आहे.
रोख पारितोषिके आणि विशेष गौरव
या स्पर्धेतील मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास ₹५,०००/-,
उपविजेत्यास ₹३,०००/-, तर तृतीय क्रमांकास ₹१,०००/- असे आकर्षक रोख पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. याशिवाय
सर्वोत्तम कबड्डीपटू,
उत्कृष्ट चढाई
आणि उत्कृष्ट पकड यासाठी विशेष वैयक्तिक पारितोषिके निश्चित करण्यात आली
आहेत.
प्रवेश नोंदणी व संपर्क
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शाळांनी ८ डिसेंबर पर्यंत प्रवेश अर्ज सादर करावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रकाश परब – क्रीडा समिती निमंत्रक
संजय आईर – व्यवस्थापक (मो. ८६५५२३३७७८)
श्री उद्यानगणेश मंदिर कार्यालय,
दूरध्वनी : ०२२-२४४६६६३४
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग,
छत्रपती शिवाजी महाराज
उद्यान, दादर-पश्चिम,
मुंबई–२८
खऱ्या अर्थाने खेळाडू घडविण्याचा संकल्प
कबड्डीची धडाडी, शिस्त, संघभावना आणि युद्धनीती यांचा थरार अनुभवताना अनेक
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या मंचावर चमकण्याची संधी मिळणार आहे. शालेय पातळीवरून
राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचणाऱ्या अनेक प्रतिभांचा जन्म अशा स्पर्धांतूनच होतो,
म्हणून ही स्पर्धा खेळाडू घडविण्याचा एक भक्कम पाया ठरणार
आहे,
यात शंका नाही.

Post a Comment
0 Comments