धी. युनायटेड
स्पोर्ट्स क्लब आयोजित कै. जे. पी. कोळी निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा
महिलांच्या उपांत्य फेरीत ज्ञानविकास वि. शिवभक्त आणि
युनायटेड वि. रा. फ. नाईक तर पुरुषांमध्ये श्री समर्थ वि. ग्रिफिन आणि शिर्सेकर
महात्मा गांधी वि. ज्ञानविकास आमनेसामने
ठाणे ४
डिसें : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व दि ॲमंच्यूअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या
मान्यतेने आणि धी. युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या भव्य आयोजनाखाली श्री दत्त जयंती उत्सव २०२५
निमित्त सुरू झालेल्या कै. जे. पी. कोळी निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो
स्पर्धेला आज रोमांचकारी फेरीचे स्वरूप लाभले. उपउपांत्य फेरीतील चुरशीच्या
लढतींनी मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
महिलांच्या उपउपांत्य सामन्यात यजमान धी युनाटेड
स्पो क्लबने शिर्सेकर महात्मा गांधी संघाचा अटीतटीच्या सामन्यात व जादा डावात १२-११ (मध्यंतर ४-४, ३-३ व ५-४) असा एक गुणाने पराभव करत विजयाचा जल्लोष केला. युनाटेडच्या
स्नेहा आहेर (३, ३, १.२० मि. संरक्षण
व २ गुण), नम्रता पडये (२.२०,
२.४० मि. संरक्षण) कृतिका
ठाणेकर (२.४०, ३.३०,
३ मि संरक्षण व २ गुण) अंजली कनोजा (५ गुण) यांनी
धमाकेदार खेळ करत रात्रीच्या थंडीत बहारदार खेळ करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तर
पराभूत शिर्सेकर महात्मा गांधीच्या स्नेहा हळदवकर (३, ३.४०, ३ मि. संरक्षण व
२ गुण) मिताली बारसकर (१.४०, २ मि.
संरक्षण व ४ गुण यांनी शेवटपर्यंत निकराची झुंज दिली मात्र शेवटी ते पराभूतच झाले.
पुरुषांच्या उपउपांत्य
सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने विहंग क्रिडा मंडळावर ११-१० (मध्यंतर ४-४) असा १ गुणाने पराभव केला. श्री समर्थच्या वेदांत देसाई (२, १.५० मि. संरक्षण
व १ गुण), हितेश आंग्रे (१.५०, १५० मि. संरक्षण व २ गुण), अनंत चव्हाण (२.१०, १.४० मि. संरक्षण) व विशाल खाके (१.३०,
१.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी सुरवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत
समाना खिशात घातला. तर पराभूत विहंगच्या लक्ष्मण
गवस (२.५० मि. संरक्षण व ३ गुण), आकाश
साळवे (२.५०, १.३० मि. संरक्षण व १ गुण), अनंत साटले (नाबाद २, १ मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेली कडवी लढत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे
पारणे फेडणारी होती.
इतर सामन्यांचे संक्षिप्त निकाल
पुरुष विभाग
१.
ग्रिफिन
जिमखाना, कोपरखैरणे यांनी आनंद भारती समाज, ठाणे वर १६-९ असा १ डाव राखून ७ गुणांनी विजय मिळवला.
२.
श्री
सह्याद्री संघ, मुंबई उपनगर यांनी राज
क्रीडा मंडळ, बदलापूर वर १८-११ असा ७ गुणांनी विजय मिळवला.
३.
श्री
समर्थ व्यायाम मंदिर, मुंबई यांनी प्रबोधन क्रीडा भवन, मुंबई उपनगर वर १५-१२ असा ३
गुणांनी विजय मिळवला.
४.
विहंग
क्रीडा मंडळ, ठाणे यांनी एनबिसिएस, घणसोली वर १३-१० असा १ डाव राखून ३ गुणांनी विजय मिळवला.
महिला विभाग
१.
शिर्सेकर
महात्मा गांधी अॅकॅडमी, बांद्रा यांनी अमरहिंद मंडळ, दादर वर ९-५ असा १ डाव राखून ४ गुणांनी विजय मिळवला.
२.
घी
युनायटेड स्पो. क्लब, ठाणे यांनी शिवनेरी सेवा मंडळ, मुंबई वर ५-२ असा १
डाव राखून ३ गुणांनी विजय मिळवला.
३.
रा.
फ. नाईक महिला संघ यांनी न्यू बॉम्बे सेंटर स्पो. क्लब वर १०-६ असा १
डाव राखून ४ गुणांनी विजय मिळवला.
४.
सरस्वती
कन्या संघ, माहीम यांनी आनंद भारती समाज, ठाणे वर १४-६ असा ८ गुणांनी विजय मिळवला.
५.
रा.
फ. नाईक महिला संघ, कोपरखैरणे यांनी सरस्वती कन्या संघ, माहीम यांचा १३-५ असा १
डाव राखून ८ गुणांनी पराभव केला.
उपांत्य लढतीत थरार शिगेला
आता उद्याच्या उपांत्य सामन्यांमध्ये महिलांमध्ये ज्ञानविकास
वि. शिवभक्त व युनायटेड वि. रा. फ. नाईक आणि पुरुषांमध्ये श्री समर्थ वि. ग्रिफिन व शिर्सेकर महात्मा गांधी वि.
ज्ञानविकास या लढती रंगणार आहे.
रणकंदनाचा आवाज, वेगवान चकवे आणि आक्रमक झेप यांचा थरार अनुभवण्यासाठी
क्रीडाप्रेमींनी मैदान गाठण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


.jpeg)
Post a Comment
0 Comments