'आमदार श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा'
शिवसेना आमदार माननीय श्री सुनील जी प्रभू यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत दशरथ कदम यांच्या विद्यमाने ५ डिसेंबरला मालाडमध्ये
रंगणार तन-मन आणि ताकदीचा उत्कर्ष सोहळा
मुंबई : शरीरसौष्ठव हा केवळ शरीर घडविण्याचा नव्हे तर शिस्त,
संयम आणि संघर्षातून घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे.
या खेळाची ताकद आणि आकर्षक तेज शहरातील मराठी तरुणाईत भिनावी या उद्देशाने
ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स
असोसिएशन आणि मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिंडोशी विधानसभा
अंतर्गत आणि आमदार माननीय सुनीलजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत दशरथ कदम, विधानसभा संघटक दिंडोशी विधानसभा यांच्या उत्साहपूर्ण विद्यमाने अत्यंत भव्य आणि प्रतिष्ठेची
‘आमदार श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा शुक्रवार, दि. ०५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता,
रॉयल क्रिस्टो बिल्डिंगच्या आतील
रस्ता, श्री
संतोषी माता मंदिर, वायसेत पाडा, कुरारगाव, मालाड पूर्व, मुंबई – ९७ येथे रंगणार आहे. मुंबईच्या फिटनेस आणि शरीरसौष्ठव
क्षेत्रातील ही स्पर्धा एक मोठा पर्वणी सोहळा ठरणार असून अनेक दमदार,
तरुण आणि अचाट क्षमता बाळगणारे शरीरसौष्ठवपटू या
व्यासपीठावर चमक दाखवणार आहेत.
संघटनांच्या आवाहनानुसार, मुंबईतील विविध व्यायामशाळा,
फिटनेस क्लब,
हेल्थ सेंटर आणि
संस्था यांना या स्पर्धेत सहभागासाठी आपआपल्या उत्कृष्ट आणि अव्वल शरीरसौष्ठवपटूंना
संधी देण्याचे आवाहन करण्यात आले असून, दिलेल्या नियम व अटींनुसार सर्व सहभागी खेळाडूंना पाठवून
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
या स्पर्धेमुळे मुंबईतील शरीरसौष्ठव क्षेत्रात नवीन
स्पर्धात्मकता, नव्या
आशा आणि नवनिर्मितीची प्रेरणा निर्माण होणार असून, उद्याचे ‘आयर्न मॅन’ घडविणाऱ्या या स्पर्धेची आजपासूनच
चर्चा रंगली आहे.
शरीर सौष्ठवाचे पुरुषार्थ, बांधणी आणि तेज यांचा भव्य प्रदर्शन सोहळा म्हणून “आमदार श्री” ही स्पर्धा नावलौकिक मिळवेल असा
विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment
0 Comments