एमसीसी सांताक्रूझचे दोन्ही संघ अंतिम फेरीत
टॅलेंट सर्च लीगमध्ये घरच्या मैदानावरच फायनलची रणधुमाळी
एमसीसी टॅलेंट सर्च बारा वर्षांखालील मुलांची क्रिकेट लीग अर्णव
रायचा अष्टपैलू जलवा, लहान खेळाडूंच्या कौशल्याचा उत्सव
भविष्यातील क्रिकेटपटूंचा झंझावात!
मुंबई : मुंबई
क्रिकेटच्या भविष्यासाठी आशेचा नवा किरण ठरलेल्या एमसीसी टॅलेंट सर्च बारा वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट
लीगमध्ये (२०२५-२०२६) अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून,
एमसीसी सांताक्रूझच्या दोन्ही
संघांमध्येच अंतिम सामना रंगणार आहे. ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशनच्या आयोजनाखाली झालेल्या या
स्पर्धेत उपांत्य फेरीत सांताक्रूझच्या खेळाडूंनी अफलातून खेळ सादर करत आपले
वर्चस्व सिद्ध केले.
पहिला उपांत्य सामना – अर्णव रायचा अष्टपैलू करिष्मा
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात एमसीसी सांताक्रूझने एमसीसी ठाणे संघावर नऊ विकेट राखून
दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या सांताक्रूझच्या
गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांची फलंदाजी उधळून लावली.
तरुण यादव
याने चार बळी वीस धावांत, तर अर्णव राय याने दोन बळी बारा धावांत घेत एमसीसी ठाणे संघाला पंचवीस षटकांत नऊ बाद एकशे सात धावांवर
रोखले. ठाणेकडून विराट सिंगने सत्तेचाळीस चेंडूत अठ्ठावीस धावा
करत सर्वोच्च योगदान दिले.
फलंदाजीत अर्णव रायने छेचाळीस चेंडूत एकावन्न धावांची नाबाद खेळी
करत संघाला पंधरा षटके आणि पाच चेंडूत सहज विजय मिळवून दिला. गोलंदाजी आणि फलंदाजीतील कामगिरीच्या
जोरावर अर्णव
राय सामनावीर ठरला.
दुसरा उपांत्य सामना – सांताक्रूझची संयमी कामगिरी
दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पायडर सीसीने प्रथम फलंदाजी करत पंचवीस षटकांत सात बाद
एकशे दोन धावा केल्या. त्यात श्रेयस गुळवेने पंचेचाळीस चेंडूत एकावन्न धावा करत झुंजार खेळी साकारली. लक्ष्याचा पाठलाग करताना
एमसीसी सांताक्रूझने तेवीस षटकांत
तीन बाद एकशे तीन धावा करत सात विकेट राखून विजय मिळवला. त्यांच्याकडून नसीम जाफरने एकोणपन्नास चेंडूत सव्वीस धावा
करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. पराभूत संघाचा
श्रेयस गुळवे सामनावीर
ठरला.
संक्षिप्त धावफलक
संक्षिप्त धावफलक: पाहिला सामना - एमसीसी ठाणे: २५ षटकांत ९ बाद १०७(विराट सिंग २८(३७), तरुण यादव ४/२०, अर्णव
राय २/१२) वि. एमसीसी सांताक्रूझ - १५.५ षटकांत १ बाद १०८(अर्णव राय ५१*(४६).
निकाल: एमसीसी सांताक्रूझ ९ विकेट राखून विजयी. सामनावीर: अर्णव राय (२/१२) आणि
५१*(४६).
दुसरा सामना - स्पायडर सीसी: २५ षटकांत ७ बाद १०२(श्रेयस गुळवे ४५(५१), अर्णव राय २/१२) वि. एमसीसी सांताक्रूझ -
२३ षटकांत ३ बाद १०३(नसीम जाफर २६(४९). निकाल: एमसीसी सांताक्रूझ ७ विकेट राखून
विजयी. सामनावीर: श्रेयस गुळवे (स्पायडर सीसी).

Post a Comment
0 Comments