Type Here to Get Search Results !

मुंबईत पहिल्यांदाच कुस्तीचा महासंग्राम! देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचा ऐतिहासिक महामुकाबला – ‘कुस्ती महादंगल २०२६’ इतिहास घडणार मुंबईत!


 

मुंबईत पहिल्यांदाच कुस्तीचा महासंग्राम!

देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचा ऐतिहासिक महामुकाबला – ‘कुस्ती महादंगल २०२६’

इतिहास घडणार मुंबईत!

 

मुंबई, दि. २२ : ताकद, तंत्र, परंपरा आणि थरार यांचा संगम अनुभवायचा असेल, तर मुंबईकरांसाठी हीच ती सुवर्णसंधी! देशातील कुस्तीविश्वाला हादरवणारा कुस्ती महादंगल २०२६’ हा ऐतिहासिक महासंग्राम पहिल्यांदाच मुंबईत रंगणार असून, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या चार बलाढ्य कुस्ती राज्यांतील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार आहेत.

 

दिग्गजाची संकल्पना, भव्य आयोजन

अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले नरसिंह यादव यांच्या संकल्पनेतून, नरसिंह फाउंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य एकदिवसीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. २६ जानेवारी रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे पार पडणार आहे.

 

चार राज्ये… चार संघ… एकच विजेता!

या महासंग्रामात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या कुस्तीच्या बलाढ्य राज्यांचे संघ सहभागी होत असून, प्रत्येक संघातून ५ पुरुष व २ महिला असे एकूण ७ पैलवान आपली ताकद पणाला लावणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

 

मराठा वॉरियर्स – महाराष्ट्राची शान

पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, वर्ल्ड मेडलिस्ट), रविराज चव्हाण, आदर्श पाटील, सोनबा गोंगाणे, अक्षय ढेरेपुरुष; अमृता पुजारी, सोनाली महाडिकमहिला.

 

शेर-ए-पंजाब – पंजाबी ताकदीचा झंझावात

करणदीप (पंजाब केसरी), संदीप मान, रोहित प्रजापत, उदय शर्मा, अभिषेक यादवपुरुष; प्रियंका सिकरवार, शिवानीमहिला.

 

हरियाणा शूर – कुस्तीची नर्सरी

अंकुश, अमित, निवान, आकाश, सागरपुरुष; कुसुम दहिया, मोनी गुर्जरमहिला.

 

यूपी योद्धा – परंपरेचा वारसा

अभिनायक सिंह (यूपी केसरी), मुलायम यादव, तेजवीर यादव, आयुष चौधरी, विशाल सहानीपुरुष; प्रियंका सिकरवार, फ्रीडम यादवमहिला.

 

मान्यवरांची उपस्थिती, दिग्गजांचा सन्मान

या ऐतिहासिक स्पर्धेला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. यावेळी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच जागतिक स्तरावर चमकलेल्या दिग्गज कुस्तीपटूंचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

 

कुस्तीला व्यावसायिक व्यासपीठ – आयोजकांची भूमिका

मुंबईत कुस्तीला व्यापक आणि व्यावसायिक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने, कुस्ती लीगच्या धर्तीवर या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथूनच उद्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा आमचा विश्वास आहे. भविष्यात देशातील प्रत्येक राज्याचा संघ या महादंगलचा भाग असेल,” असे आयोजक नरसिंह यादव यांनी सांगितले.

 

कुस्तीप्रेमींना आवाहन

या ऐतिहासिक ‘कुस्ती महादंगल २०२६’ ला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकदीचा, तंत्राचा आणि थराराचा अनुभव घ्यावा, असे आवाहन नरसिंह फाउंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments