स्वप्नांनाही विम्याची साथ!
एसबीआय लाइफचे नवे ब्रँड ॲम्बेसेडर ऋषभ पंत व रवींद्र जडेजा
‘जॉली अँड पॉली’ मोहिमेतून जीवनविम्याचा नवा अर्थ
मुंबई : क्रिकेटच्या
मैदानावर जिद्द, आत्मविश्वास
आणि जबाबदारीचे प्रतीक ठरलेले ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा आता जीवनातील सुरक्षित भविष्याचा संदेश देणार आहेत.
भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या
एसबीआय लाइफ इन्शुरन्सने या दोन क्रिकेट सुपरस्टार्सची नवे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करत ‘जॉली अँड पॉली’
ही प्रभावी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
‘जॉली’ आणि ‘पॉली’ – दोन भूमिका,
एकच संदेश
या मोहिमेत ऋषभ पंत ‘जॉली’ तर रवींद्र जडेजा ‘पॉली’ या भूमिकेत दिसणार आहेत. ‘जॉली’ लोकांना
स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
धैर्य देतो, तर
‘पॉली’ कौटुंबिक
जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत भविष्याची आखणी करण्यास प्रवृत्त करतो.
वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि कुटुंबाची सुरक्षितता यांचा
समतोल साधण्याचा संदेश या मोहिमेतून ठळकपणे मांडण्यात आला आहे.
‘अपने लिए, अपनों के लिए’ – तत्त्वज्ञानाचा विस्तार
जीवन विम्याविषयी वाढत असलेल्या जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर
एसबीआय लाइफ
लोकांच्या दैनंदिन आयुष्यात हा विषय अधिक अर्थपूर्ण
बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘अपने लिए, अपनों के लिए’ या ब्रँड तत्त्वज्ञानावर आधारित ‘जॉली अँड पॉली’ ही मोहीम
स्वतःची स्वप्ने आणि कुटुंबाची
सुरक्षितता या दोन्ही गोष्टी एकत्र शक्य आहेत, हे सोप्या भाषेत समजावते.
महत्त्वाकांक्षा बदलत आहेत,
समतोल महत्त्वाचा –
रवींद्र शर्मा
एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड,
कॉर्पोरेट
कम्युनिकेशन्स आणि सीएसआर विभागाचे प्रमुख रवींद्र शर्मा म्हणाले, “भारतामध्ये प्रत्येक पिढीसोबत महत्त्वाकांक्षा बदलत आहेत.
लोक अर्थपूर्ण आयुष्य जगू इच्छितात, पण त्याचवेळी कौटुंबिक जबाबदाऱ्याही पेलू इच्छितात.
जीवन विमा हा हा समतोल साधण्याचे
प्रभावी साधन आहे. ‘जॉली अँड पॉली’ ही संकल्पना दाखवते की, आर्थिकदृष्ट्या सज्ज असलेली व्यक्ती आत्मविश्वासाने पुढे
जाऊ शकते.”
तरुणांच्या स्वप्नांना बळ – ‘जॉली’ ऋषभ पंत
ब्रँड ॲम्बेसेडर ऋषभ पंत (जॉली) म्हणाला, “आपल्या देशातील तरुणांची स्वप्ने मोठी आहेत. त्या
स्वप्नांना पंख देण्यासाठी संधी मिळायला हव्यात, यावर माझा ठाम विश्वास आहे. एसबीआय लाइफची भविष्य घडवण्याची वचनबद्धता मला मनापासून
भावली. जॉली म्हणून मी कुटुंबांना त्यांच्या मुलांना त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करू
देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.”
नियोजनातून सुरक्षित भविष्य – ‘पॉली’ रवींद्र जडेजा
ब्रँड ॲम्बेसेडर रवींद्र जडेजा (पॉली)
म्हणाला, “एसबीआय लाइफसोबत जोडले गेल्यामुळे देशभरातील कुटुंबांशी
संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. पॉली म्हणून मी लोकांना विचारपूर्वक नियोजन करण्यास प्रोत्साहित करत आहे, जेणेकरून वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करताना कौटुंबिक
जबाबदाऱ्यांशी तडजोड करावी लागणार नाही. वैयक्तिक आकांक्षा आणि कौटुंबिक ध्येय यांचा समतोल साधणे
हेच खरे सबलीकरण आहे.”
एक व्यक्ती, एक कुटुंब – प्रगतीचा नवा दृष्टिकोन
‘जॉली अँड पॉली’ मोहिमेद्वारे एसबीआय लाइफ इन्शुरन्स केवळ विमा योजना नव्हे, तर सांस्कृतिक बदलाचा संदेश देत आहे. आर्थिक सुरक्षेच्या आधारावर स्वप्नपूर्ती शक्य आहे,
हा विश्वास निर्माण करत एक व्यक्ती – एक कुटुंब – आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या
प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा प्रयत्न ठरत आहे.

Post a Comment
0 Comments