अजितदादा पवार क्रीडा नगरीत
‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला
अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व
महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने!
कै. उमेश शेणॉय स्मृती चषक व्यावसायिक
स्पर्धेत पुरुष गटात महासंग्राम
महिला गटात पश्चिम रेल्वेची दणदणीत
तर मुंबई पोलिसांचा दमदार विजय
अंतिम फेरीच्या दिशेने विजेचा वेग,
मैदानावर रोमांचाचा ज्वालामुखी उसळला!
मुंबई : दादरच्या
अजितदादा
पवार क्रीडा नगरीत सध्या ‘डायनॅमिक’ व्यावसायिक खो-खो
स्पर्धेचा अक्षरशः जंगी जल्लोष सुरू असून प्रत्येक सामना म्हणजे थरार,
जिद्द आणि विजेच्या वेगाचा
अविस्मरणीय संग्राम ठरत आहे. कै. उमेश शेणॉय स्मृती चषक
स्पर्धेत पुरुष गटात पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट
यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत
करत अंतिम फेरीत धडक मारली, तर महिला गटात पश्चिम रेल्वे
व मुंबई पोलिस
यांनी दमदार विजय मिळवत आपले
वर्चस्व सिद्ध केले. मैदानावर प्रत्येक क्षणाला रोमांचाचा स्फोट होत असून
प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार अनुभवायला मिळत आहे.
पुरुष उपांत्य फेरी : पश्चिम
रेल्वेची बृहन्मुंबई महानगरपालिकेवर विजयी झेप
या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाणेफेक
जिंकून आक्रमण स्वीकारले, मात्र त्याचा फायदा घेण्यात अपयश
आले आणि पश्चिम रेल्वेने २४-१७ असा ४.३० मि. राखून ७ गुणांनी
विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. विजयी पश्चिम रेल्वेच्या माधव दिपक (१.३०
व १.५० मि. संरक्षण), राहूल मंडल (१.५० मि. संरक्षण व ६
गुण), आदित्य गणपुले (१.२० मि. संरक्षण व ४ गुण),
मजहर जमादार (२ मि. संरक्षण व २ गुण), वृषभ वाघ (१.५० मि. संरक्षण व ४
गुण) यांनी निर्णायक कामगिरी करत विजय साकारला. पराभूत
बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या सूरज खाके (१.३० मि. संरक्षण व ४ गुण),
पियूश घोलम (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), प्रसाद भाटकर (१ मि. संरक्षण),
आदित्य पाटील (१.१० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली. या
सामन्यावर देवेंद्र बर्डे यांनी पंचप्रमुख म्हणून काम
पाहिले.
पुरुष उपांत्य फेरी : महाराष्ट्र
पोष्टची बँक ऑफ इंडियावर विजयी मोहिम
या सामन्यात बँक ऑफ इंडियाने नाणेफेक जिंकून
संरक्षण स्वीकारले, मात्र महाराष्ट्र पोष्टने ३०-२३ असा ७
गुणांनी शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
विजयी महाराष्ट्र पोष्टाच्या हर्षद
हातणकर (२ व १.२० मि. संरक्षण), आकाश साळवे (२ मि. संरक्षण),
शुभम उत्तेकर (१.३० मि. संरक्षण व ८ गुण),
धिरज भावे (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), लक्ष्मण गवस (६ गुण)
यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा
उचलला. पराभूत बँक ऑफ इंडियाच्या जर्नादन सावंत (१.३५ मि. संरक्षण व
२ गुण), सुजल जायगडे (२ मि. संरक्षण व २ गुण),
अर्पित तिवारी (२.३० मि. संरक्षण व २ गुण),
रामचंद्र झोरे (८ गुण), मयुरेश मोरे (१.२० मि. संरक्षण व ४
गुण) यांनी दिलेली झुंज अपुरी ठरली. या सामन्यावर
गणेश
गवंडी यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.
महिला साखळी : मुंबई पोलिसांचा
महावितरणवर दमदार विजय
या सामन्यात मुंबई पोलिसांनी नाणेफेक जिंकून
संरक्षण स्वीकारले आणि २२-१८ असा १० सेकंद राखून ४
गुणांनी विजय मिळवला. विजयी मुंबई पोलिसांच्या पायल पवार (२
मि. संरक्षण व ४ गुण), प्रिया भोईर (४.१० मि. संरक्षण व ६
गुण), दिक्षा सोनसुतकर (२.५० मि. संरक्षण व ६ गुण),
ऐश्वर्या पेठे (१.४० मि. संरक्षण) यांनी पोलिसी खाक्या दाखवत विजय
निश्चित केला. पराभूत महावितरणच्या मनाली काजरे (१.४०
मि. संरक्षण व २ गुण), रोशनी जुनघरे (३.२० मि. संरक्षण व
४ गुण), मीना कांबळे (३.१० मि. संरक्षण व ४ गुण),
प्रिया पाटील (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
महिला साखळी : पश्चिम रेल्वेचा
मुंबई पोलिसांवर एकतर्फी विजय
या सामन्यात पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून
संरक्षण स्वीकारले आणि २९-९ असा एक डाव व २० गुणांनी
मुंबई पोलिसांचा धुव्वा उडवला. विजयी पश्चिम रेल्वेच्या संध्या सुरवासे
(४.२० मि. संरक्षण), मोकाशी (नाबाद २.४० मि. संरक्षण),
अर्चना माझी (२.३० मि. संरक्षण), मगाई माझी (२.५० मि. संरक्षण व ६
गुण), दिव्या गायकवाड (नाबाद १ मि. संरक्षण व ६ गुण),
किशोरी कल्याणी कंक (६ गुण) यांनी सामन्यावर संपूर्ण वर्चस्व
राखले. पराभूत मुंबई पोलिसांच्या दिक्षा सोनसुरकर (१.५० मि. संरक्षण
व २ गुण), सुर्वणा सुरवसे (२ मि. संरक्षण),
पायल पवार (१ मि. संरक्षण), सपना आंबवले (२ गुण)
यांनी लढत दिली,
मात्र विजय दूरच राहिला.
अंतिम फेरीत विजेतेपदासाठी
महासंग्राम सज्ज!
स्पर्धेतील सर्व सामने आता
निर्णायक टप्प्यात पोहोचले असून पुरुष अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट
यांच्यात विजेतेपदासाठी महासंग्राम
रंगणार आहे. पश्चिम रेल्वेने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून अंतिम
विजेतेपदासाठी त्यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. अजितदादा पवार क्रीडा
नगरीत आता अंतिम फेरीच्या महासंग्रामाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून
खो-खोप्रेमींसाठी हा थरार अविस्मरणीय ठरणार आहे!
छायाचित्र : दिनेश घाडीगांवकर




.jpeg)



Post a Comment
0 Comments