वडाळ्यात ताकदीचा महासंग्राम! वडाळ्यात ‘पॉवर’चा जल्लोष
सिनियर व मास्टर्स क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६
ला सज्ज; ३००
हून अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित
ज्ञानेश्वर विद्यालयात रंगणार राज्यस्तरीय स्पर्धेचा थरार
मुंबई : शारीरिक
सामर्थ्य,
इच्छाशक्ती आणि जिद्दीचा कस पाहणारी सिनियर व मास्टर्स क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६
येत्या २१ व २२ फेब्रुवारी रोजी वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात
दिमाखात पार पडणार असून, राज्यभरातील तब्बल ३०० पेक्षा अधिक ताकदवान खेळाडू या स्पर्धेत आपली क्षमता आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग
असोसिएशन यांच्या विद्यमाने आणि नागरिक सहाय्य केंद्र विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने
आयोजित या स्पर्धेमुळे वडाळा परिसरात क्रीडाउत्सवाचे
वातावरण निर्माण झाले आहे.
दिव्यांग खेळाडूंनाही समान संधी
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र गटातील स्पर्धा
देखील आयोजित करण्यात आली असून,
ती २२ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यामुळे सर्वसमावेशक क्रीडा संस्कृतीला
चालना मिळणार असून, दिव्यांग खेळाडूंना आपली ताकद आणि जिद्द सिद्ध करण्याचे व्यासपीठ मिळणार आहे.
उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे आकर्षण
स्पर्धेचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता,
तर समारोप सोहळा २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता
होणार आहे. या सोहळ्यात प्रत्येक गटातील
प्रथम ३ क्रमांक पटकावणाऱ्या
खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
संघटनात्मक तयारी जोरात
महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय
सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकारी अथक
परिश्रम घेत असून, राज्यातील बलाढ्य पॉवरलिफ्टर्सना या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संजय सरदेसाई (मोबाईल : ९३२०७२९९२७)
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments