Type Here to Get Search Results !

७२वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचा दणदणीत विजयी धडाका! सलग दुसऱ्या विजयाने बाद फेरीत प्रवेश निश्चित बडोद्यात महाराष्ट्राचा विजयगर्जना ड गटात महाराष्ट्राची विजयी मोहीम वेगात!

 

७२वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

महाराष्ट्राचा दणदणीत विजयी धडाका!

सलग दुसऱ्या विजयाने बाद फेरीत प्रवेश निश्चित

बडोद्यात महाराष्ट्राचा विजयगर्जना

ड गटात महाराष्ट्राची विजयी मोहीम वेगात!

 

बडोदा : बडोद्यात महाराष्ट्राच्या शौर्याचा जयघोष घुमला! ७२व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने सलग दुसरा विजय नोंदवत बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. गुजरातमधील सागा बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्राने ड गटातील लढतीत कर्नाटकवर ४९-२५ असा दणदणीत विजय मिळवला. आक्रमक चढाया, भक्कम पकडी आणि अचूक रणनीतीच्या जोरावर महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चित केले.

 

कर्नाटकचा ४९-२५ ने पराभव – पूर्वार्धातच इरादा स्पष्ट

महाराष्ट्राने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. पूर्वार्धात २४-१३ अशी भक्कम आघाडी घेत महाराष्ट्राने विजयाचा इरादा स्पष्ट केला. उत्तरार्धातही तोच जोश कायम ठेवत महाराष्ट्राने ४९-२५ असा एकतर्फी विजय साकारला.
असलम इनामदार यांनी चौफेर झंझावाती चढाया करत कर्नाटकचा बचाव खिळखिळा केला. त्यांना चढाईत आदित्य शिंदे आणि शिवम पठारे यांची भक्कम साथ लाभली. तर बचावात संकेत सावंत, दादासो पुजारी आणि जयेश महाजन यांनी अचूक पकडी करत संघाला भक्कम आधार दिला. महाराष्ट्राची गटातील अखेरची साखळी लढत आता त्रिपुरा संघाविरुद्ध होणार आहे.

 

विजयी सलामी – दिल्लीवर ५०-३७ असा दमदार विजय

या आधी रात्री उशीरा झालेल्या ड गटातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचे आव्हान ५०-३७ असे परतवून लावले. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केल्याने मध्यंतरापर्यंत सामना अत्यंत चुरशीचा झाला. विश्रांतीला महाराष्ट्राकडे अवघी २४-२२ अशी २ गुणांची आघाडी होती. मात्र उत्तरार्धात महाराष्ट्राने टॉप गिअर टाकत गुणांचे अर्धशतक गाठले. दुसऱ्या डावात महाराष्ट्राने २६ गुणांची कमाई केली, तर दिल्लीला अवघे १५ गुण मिळवता आले. अखेरीस महाराष्ट्राने १३ गुणांनी विजय मिळवला.

 


चढाई-बचावाची परफेक्ट सांगड – संघाचा सामूहिक विजय

दिल्लीविरुद्धच्या विजयात आदित्य शिंदे, असलम इनामदार आणि अजित चौहान यांच्या झंझावाती चढाया निर्णायक ठरल्या. त्यांना बचावात दादासो पुजारी, संकेत सावंत आणि जयेश महाजन यांची भक्कम साथ लाभली. संघाच्या एकत्रित आणि संतुलित खेळामुळे हा विजय शक्य झाला.


Post a Comment

0 Comments