Type Here to Get Search Results !

दणकट इच्छाशक्तीची दणदणीत झुंज! राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग २०२६ मध्ये सुष्मिता देशमुख आणि तन्विर कोतवाल ‘सर्वोत्तम लिफ्टर’ वडाळ्यात बारबेलचा गडगडाट, राज्यभरातून ३५० हून अधिक खेळाडूंची उपस्थिती

 


दणकट इच्छाशक्तीची दणदणीत झुंज!

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग २०२६ मध्ये सुष्मिता देशमुख आणि तन्विर कोतवाल ‘सर्वोत्तम लिफ्टर’

वडाळ्यात बारबेलचा गडगडाट, राज्यभरातून ३५० हून अधिक खेळाडूंची उपस्थिती

 

मुंबई : ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा येथे बारबेलच्या प्रत्येक उचलासोबत टाळ्यांचा कडकडाट घुमला आणि ताकद, तंत्र व चिकाटीची खरी कसोटी लागली! महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन नागरिक सहाय्य केंद्र, वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य अजिंक्यपद, वरिष्ठ, मास्टर्स, महिला गट निवड चाचणी २०२६ स्पर्धेत राज्यातील १५ जिल्ह्यांमधून ३५० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला. या थरारक स्पर्धेत ठाण्याची सुष्मिता देशमुख आणि सांगलीचा तन्विर कोतवाल यांनी ‘सर्वोत्तम लिफ्टरहा किताब पटकावत आपला दबदबा सिद्ध केला.

 

दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन

उद्घाटन सोहळ्यास क्रीडा महर्षी मधुकर तळवलकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त संजीवन भास्करन, व्यायाम महर्षी पपी पाटील, सुहास पाठारे, गोपाळ कोळी, गजानन वाईरकर, विजय परदेशी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मधुकर पाटकर, डॉ. अर्जुन मुरुडकर, सदानंद चिखले यांची मान्यवर उपस्थिती लाभली. स्पर्धेच्या यशासाठी भास्कर सावंत, सूर्यकांत गर्दे, संजय माधव, अनंत चाळके, राजहंस मेहंदळे, जितेंद्र यादव यांनी मोलाचे योगदान दिले.

 


निकालाचा धडाका

वरिष्ठ महिला गट – ताकदीची सुवर्णकामगिरी

४९ किलो : अमृता भगत (रायगड) प्रथम, देबुश्री सवानल (पुणे) द्वितीय, सायली सन्नक (रत्नागिरी) तृतीय


५२ किलो : सुष्मिता देशमुख (ठाणे) प्रथम, तनवी तापडिया (पुणे) द्वितीय, वैष्णवी चव्हाण (मुंबई) तृतीय


५७ किलो : दीप्ती सावंत (ठाणे) प्रथम, संजना ठमके (ठाणे) द्वितीय, धनश्री पासाळकर (पुणे) तृतीय


६३ किलो : सोनाल निवाळकर (पुणे) प्रथम, अनिशा बिर्ला (मुंबई उपनगर) द्वितीय, चैत्राली कुलकर्णी (पुणे) तृतीय


६९ किलो : सारा मुकादम (मुंबई उपनगर) प्रथम, आरती आंबेरकर (सिंधुदुर्ग) द्वितीय, संजीवनी तांडेल (पालघर) तृतीय


७६ किलो : सेजल मोईकर (पुणे) प्रथम, युती धुमकेकर (अहिल्यानगर) द्वितीय, मेरीन अपेन (ठाणे) तृतीय


८४ किलो : संहीता मलिक (मुंबई उपनगर) प्रथम, दीक्षा राऊत (ठाणे) द्वितीय, स्वप्ना भास्कर (नाशिक) तृतीय


८४ किलोवरील : कॅरोलीन पेटसी (पुणे) प्रथम, प्रिया राव (मुंबई उपनगर) द्वितीय, तन्वी सुर्वे (रत्नागिरी) तृतीय

 

वरिष्ठ पुरुष गट – तन्विरचा पराक्रम

५९ किलो : यज्ञेश कावले (मुंबई) प्रथम, योगेश गुंड (मुंबई) द्वितीय, ग्लेन फर्नांडिस (ठाणे) तृतीय


६६ किलो : गणेश शाहू (मुंबई उपनगर) प्रथम, रोहित देशमुख (ठाणे) द्वितीय, साहिल लांजेकर (पुणे) तृतीय


७४ किलो : तन्विर कोतवाल (सांगली) प्रथम, तेजस काकडे (पुणे) द्वितीय, हेमंत कांबळे (ठाणे) तृतीय


८३ किलो : राजेश लांजेकर (ठाणे) प्रथम, केतन नेमाडे (जळगाव) द्वितीय, दीपक शाहू (पालघर) तृतीय


९३ किलो : जितेंद्र राणे (मुंबई) प्रथम, अॅग्नेल नाडर (ठाणे) द्वितीय, संतोष वाघमारे (नवी मुंबई) तृतीय


१०५ किलो : अनिकेत कांबळे (मुंबई उपनगर) प्रथम, चैतन्य कोलापे (पुणे) द्वितीय, डेव्हिड पोतराज (ठाणे) तृतीय


१२० किलो : शिवम ठाकुर (पुणे) प्रथम, आदित्य घरत (नवी मुंबई) द्वितीय, अभिषेक मूल्या (मुंबई) तृतीय


१२० किलोवरील : सुनील जैन (ठाणे) प्रथम, रोहित पवार (पुणे) द्वितीय

 


ताकद, तंत्र आणि जिद्दीचा संगम

या स्पर्धेने महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंगचा दर्जा अधोरेखित केला. सुष्मिता देशमुख आणि तन्विर कोतवाल यांच्या ‘सर्वोत्तम लिफ्टर’ किताबाने स्पर्धेला सुवर्णमुकुट चढवला. राज्यभरातील खेळाडूंच्या कामगिरीमुळे पॉवरलिफ्टिंगला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले.


Post a Comment

0 Comments