कलबुर्गीत आंतरराष्ट्रीय टेनिसचा महोत्सव : आयटीएफ
डब्ल्यू३५ स्पर्धेने रंगणार ऐतिहासिक पर्व
१ ते ८ मार्च २०२६ दरम्यान चंद्रशेखर पाटील स्टेडियमवर ३०,००० डॉलर्सची स्पर्धा; वैष्णवी आडकर, अंकिता रैना, श्रीवल्ली भामिडीपतींसह ११ देशांतील खेळाडूंची उपस्थिती
कलबुर्गी शहर आता आंतरराष्ट्रीय महिला टेनिसच्या नकाशावर
ठळकपणे झळकणार आहे! १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान येथे प्रथमच आयटीएफ डब्ल्यू३५ कलबुर्गी ही प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा रंगणार
असून,
ही स्पर्धा शहराच्या क्रीडा इतिहासातील सर्वात मोठी महिला
आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार आहे. ३०,००० अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेची ही स्पर्धा ‘इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन’च्या
महिला वर्ल्ड टेनिस टूरअंतर्गत आयोजित केली जात आहे. चंद्रशेखर पाटील स्टेडियमवर
रंगणारा हा थरार कलबुर्गीसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
११ देशांचा सहभाग, ३२ खेळाडूंची मुख्य फेरी
स्पर्धेत ३२ खेळाडूंची एकेरी मुख्य फेरी,
त्याआधी १ मार्चपासून ३२ खेळाडूंची पात्रता फेरी,
तसेच १६ जोड्यांची दुहेरी स्पर्धा होणार आहे. मुख्य सामने ३ मार्चपासून सुरू होतील. आयटीएफ डब्ल्यू३५ दर्जाच्या या स्पर्धेत जागतिक
क्रमवारी गुणांची संधी असल्याने उच्च स्तरावर झेप घेण्याची संधी खेळाडूंना मिळणार
आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर थायलंडची अचिसा चांता (क्रमवारी ४४३)
आणि नेदरलँड्सची जॅस्मिन गिम्ब्रेरे (क्रमवारी ४३१)
यांसारख्या खेळाडूंचा सहभाग स्पर्धेची रंगत वाढवणार आहे.
भारतीय तडका : वैष्णवी आडकर आघाडीवर
भारतीय खेळाडूंची उपस्थितीही तितकीच दमदार आहे. उदयोन्मुख
तारा वैष्णवी
आडकर हिने नुकतेच भारतात क्रमांक २ स्थान गाठले असून, गेल्या आठवड्यात बेंगळुरूमधील केपीबी ट्रस्ट आयटीएफ महिला
ओपन डब्ल्यू१०० स्पर्धेत २००९ नंतर प्रथमच आयटीएफ डब्ल्यू१०० स्तराच्या अंतिम फेरीत
पोहोचणारी भारतीय महिला ठरून इतिहास रचला. तिच्यासोबत श्रीवल्ली रश्मिका भामिडीपती,
अंकिता रैना,
तसेच झील देसाई, आकांक्षा निट्टुरे, श्रुती आहलावत आणि सोनल पाटील या खेळाडू मुख्य फेरीत उतरतील.
कर्नाटकाची टेनिस राजधानीकडे वाटचाल
कर्नाटकने अलीकडील काळात डेव्हिस कप क्वालिफायर्स, बिली जीन किंग कप प्ले-ऑफ्स,
बेंगळुरू ओपन एटीपी १२५ चॅलेंजर
आणि केपीबी ट्रस्ट आयटीएफ महिला ओपन (डब्ल्यू१००)
यांसारख्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. आता आयटीएफ
डब्ल्यू३५ कलबुर्गी ही त्या मालिकेतील नवी भर ठरणार आहे.
राज्याचे आयटी, बीटी व ग्रामीण विकास मंत्री आणि केएसएलटीएचे वरिष्ठ
उपाध्यक्ष प्रियंक खर्गे यांनी सांगितले, “ही स्पर्धा राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी
वाढवण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. युवा खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी अशा स्पर्धा
अत्यंत आवश्यक आहेत.”
जागतिक नकाशावर कलबुर्गीची होणार ठळक नोंद
२०१२ आणि २०१५ मध्ये १०,००० डॉलर्सच्या आयटीएफ स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या
कलबुर्गीने आता मोठी झेप घेत डब्ल्यू३५ स्तर गाठला आहे. ही उंची केवळ बक्षीस रक्कमीत नव्हे,
तर जागतिक दर्जाच्या स्पर्धात्मकतेतही वाढ दर्शवते.
कलबुर्गी आता केवळ ऐतिहासिक शहर नसून,
भारतीय महिला टेनिसच्या नव्या पर्वाचे साक्षीदार ठरणार आहे!


Post a Comment
0 Comments