शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत झैद–समृद्धीला अग्र
मानांकन!
१७ वी राज्य मानांकन स्पर्धा;
शिवाजी पार्कवर कॅरमचा
महाथरार
शिवाजी पार्कवर कॅरमचा रणसंग्राम
मुंबई : मुंबईच्या क्रीडाविश्वाचे हृदय मानल्या जाणाऱ्या
शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा कॅरमचा थरार सज्ज झाला आहे. अव्वल
खेळाडूंच्या उपस्थितीत, दर्जेदार लढतींचे साक्षीदार होण्याची संधी देणारी १७ वी शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता दिमाखात सुरू होत आहे.
स्पर्धेचे आयोजन व मान्यता
ही स्पर्धा शिवाजी पार्क जिमखाना यांच्या आयोजनाखाली, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच सारस्वत बँक यांच्या पुरस्कृततेखाली आयोजित करण्यात आली आहे.
विक्रमांक सहभाग : पुरुष–महिला गटात मोठी उपस्थिती
या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात एकंदर २८० खेळाडूंनी,
तर महिला एकेरी गटात ३६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, राज्यभरातील नामवंत व उदयोन्मुख कॅरमपटूंची रेलचेल पाहायला
मिळणार आहे.
अग्र मानांकन : झैद व समृद्धी आघाडीवर
पुरुष एकेरी गटात ठाण्याच्या झैद अहमद याने प्रथम मानांकन पटकावले असून,
महिला एकेरी गटात ठाण्याच्याच समृद्धी घाडीगावकर हिने अग्र मानांकन मिळवले आहे. दोघांच्या खेळाकडे स्पर्धेत
विशेष लक्ष लागून राहणार आहे.
थेट प्रसारण : चाहत्यांसाठी खास सोय
ही स्पर्धा शिवाजी पार्क जिमखान्याच्या मागील पटांगणात
खेळवण्यात येणार असून, अंतिम फेरीसह इतर महत्त्वाच्या सामन्यांचे थेट प्रसारण
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे.
पुरुष एकेरी मानांकन
झैद अहमद (ठाणे), सागर वाघमारे (पुणे), महम्मद घुफ्रान (मुंबई), विकास धारिया (मुंबई), अभिजित त्रिपनकर (पुणे), संदीप दिवे (जळगाव), सिद्धांत वाडवलकर (मुंबई),
समीर अंसारी (ठाणे).
महिला एकेरी मानांकन
समृद्धी घाडीगावकर (ठाणे),
आकांक्षा कदम (रत्नागिरी),
प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर),
मिताली पाठक (मुंबई),
रिंकी कुमारी (मुंबई),
सोनाली कुमारी (मुंबई),
निलम घोडके (मुंबई),
चैताली सुवारे (ठाणे).

Post a Comment
0 Comments