एल अॅण्ड टी मुंबई ओपन २०२५ : जागतिक दर्जाच्या आयोजनातून
एमएसएलटीएने भारतीय टेनिसची उंची आणखी उंचावली
डब्ल्यूटीए १२५ मालिकेच्या यशस्वी आयोजनातून आंतरराष्ट्रीय
टेनिस नकाशावर मुंबईची ठळक छाप
मुंबईत टेनिसचा जागतिक जल्लोष
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा टेनिसचा जागतिक जल्लोष अनुभवायला मिळाला!
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना
(एमएसएलटीए) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन २०२५ च्या पाचव्या आवृत्तीने भारतीय टेनिससाठी नवे मानदंड
प्रस्थापित केले. डब्ल्यूटीए १२५ दर्जाच्या या स्पर्धेने जागतिक दर्जाचे आयोजन,
उच्च दर्जाची स्पर्धात्मकता आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद यांचा परिपूर्ण संगम साधत भारतातील टेनिस अनुभवाची गुणवत्ता नव्या उंचीवर
नेली.
आठवडाभराचा थरार : दर्जेदार टेनिसचा उत्सव
आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत अव्वल आंतरराष्ट्रीय
खेळाडूंसह भारतातील आशादायी उदयोन्मुख खेळाडू सहभागी झाले होते. प्रत्येक फेरीत
रंगलेल्या चुरशीच्या लढतींमुळे प्रेक्षकांना उच्च दर्जाच्या टेनिसचा थरार अनुभवता
आला. अंतिम फेरीसाठी झालेली मोठी गर्दी या स्पर्धेची वाढती लोकप्रियता अधोरेखित
करणारी ठरली. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी कोर्टची गुणवत्ता, सुविधा आणि आदरातिथ्य यांचे विशेष कौतुक केले.
एकेरीचा मुकुट : मननचया सावंगकावची विजयी गाथा
एकेरीत थायलंडची मननचया सावंगकाव हिने विजेतेपद पटकावत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची मोहोर
उमटवली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ती याच स्पर्धेत उपविजेती ठरली होती. विजेतेपदानंतर बोलताना
सावंगकाव म्हणाली, “येथील आदरातिथ्य सर्वोत्तम होते. सराव कोर्ट,
प्रवास आणि निवास
व्यवस्था अत्यंत दर्जेदार होत्या. लोकांचे प्रेम आणि स्वागत अविस्मरणीय आहे. पुढील
वर्षी पुन्हा एल अॅण्ड टी मुंबई ओपनमध्ये खेळायला नक्की येईन.”
भारतीय खेळाडूंना संधी : एमएसएलटीएचा व्यापक दृष्टिकोन
एल अॅण्ड टी मुंबई ओपन ही स्पर्धा भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव
देण्याच्या एमएसएलटीएच्या दीर्घकालीन धोरणाचा कणा बनली आहे. दरवर्षी संघटनेतर्फे एटीपी चॅलेंजर आणि डब्ल्यूटीए १२५ चॅलेंजर (भारतातील एकमेव)
स्पर्धांचे आयोजन केले जाते. यासाठी साधारण
३.५ कोटी रुपये
खर्च होतात. या माध्यमातून भारतीय खेळाडूंना मायदेशातच उच्च
दर्जाच्या स्पर्धा खेळण्याची व एटीपी तसेच डब्ल्यूटीए गुण मिळवण्याची संधी मिळते.
महाराष्ट्रभर आंतरराष्ट्रीय जाळे
एमएसएलटीए केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे मजबूत जाळे विणत आहे. सध्या
पुरुष व महिलांसाठी सहा आयटीएफ,
एक कुमार आयटीएफ
आणि एटीएफ मालिका स्पर्धांचे आयोजन केले जाते. यासाठी सुमारे
२ कोटी रुपये
खर्च केले जातात. यामुळे राज्यातील खेळाडूंना बाहेर न जाता
जागतिक दर्जाचा अनुभव मिळतो, तसेच तरुण अधिकारी व स्पर्धा कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक
संधी निर्माण होतात.
वाईल्ड कार्ड व राष्ट्रीय बांधिलकी
भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे यासाठी
वाईल्ड कार्डचा प्रभावी वापर केला जातो. यासोबतच जिल्हा संघटना,
संलग्न क्लब आणि राष्ट्रीय कुमार स्पर्धांना आर्थिक मदत
दिली जाते. मुंबई, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होत
असून,
राज्यभरात स्पर्धात्मक संधींचे सुयोग्य वेळापत्रक सुनिश्चित
केले जाते.
तळागाळातून घडणारी ताकद
तळागाळापासून प्रगती हे एमएसएलटीएचे मुख्य ध्येय आहे. दरवर्षी
१० वर्षांखालील खेळाडूंसाठी वीसहून
अधिक राज्य मानांकन स्पर्धा घेतल्या जातात. यासोबतच तज्ज्ञ मार्गदर्शन,
पोषण, तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरता यावर विशेष भर दिला जातो.
दूरदृष्टीचा निर्धार : नेतृत्वाची ठाम भूमिका
एमएसएलटीएचे अध्यक्ष प्रशांत सुतार म्हणाले, “एल अॅण्ड टी मुंबई ओपनचे यश हे आमच्या स्पर्धात्मक टेनिस
परिसंस्था उभारण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. पुढील टप्प्यात आम्ही मुंबईत
डब्ल्यूटीए २५०
स्पर्धा आणण्याचा
प्रयत्न करत आहोत.”
सचिव सुंदर अय्यर यांनीही पायाभूत सुविधा, खेळाडू सुविधा आणि स्थळ विकासावर सातत्याने भर देण्याचा
निर्धार व्यक्त केला.
.jpeg)

.jpeg)

Post a Comment
0 Comments