Type Here to Get Search Results !

एमसीसी गोल्डचा झंझावात; पर्पलवर ४ विकेट राखून दणदणीत विजय एमसीसी प्रो-४० लीग (प्लेट गट) मध्ये नेहल चौहानचा पंजा, युवराज सलारियाची आक्रमक अर्धशतकी खेळी

 


एमसीसी गोल्डचा झंझावात; पर्पलवर ४ विकेट राखून दणदणीत विजय

एमसीसी प्रो-४० लीग (प्लेट गट) मध्ये नेहल चौहानचा पंजा, युवराज सलारियाची आक्रमक अर्धशतकी खेळी

 

मुंबई : गोलंदाजांच्या भेदक माऱ्याने सामना पूर्णतः आपल्या बाजूने झुकवत आणि फलंदाजांच्या आत्मविश्वासपूर्ण खेळीच्या जोरावर एमसीसी गोल्ड संघाने एमसीसी प्रो-४० लीग क्रिकेट स्पर्धेत (प्लेट गट) एमसीसी पर्पल संघावर ४ विकेट राखून दणदणीत विजय साकारला. या विजयात नेहल चौहानच्या घातक गोलंदाजीसह युवराज सलारियाच्या आक्रमक फलंदाजीने निर्णायक भूमिका बजावली.

 

नेहल चौहानचा कहर; पर्पल संघ १५४ धावांत रोखला

सामन्यात नाणेफेक जिंकून एमसीसी गोल्ड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यानंतर एमसीसी पर्पल संघाला ४० षटकांत ९ बाद १५४ धावांवर मर्यादित ठेवण्यात गोल्डच्या गोलंदाजांनी यश मिळवले. त्यात नेहल चौहानने अप्रतिम गोलंदाजी करत १५ धावांत ५ विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाचा कणा मोडला. पर्पल संघाकडून प्रिन्स कुमारने ७६ चेंडूत ४३ धावा, तर आयुष गुप्ताने ५२ चेंडूत ३० धावा करत थोडा प्रतिकार केला.

 

युवराज सलारियाची धडाकेबाज खेळी; लक्ष्य सहज पार

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना एमसीसी गोल्ड संघाने आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करत २१.१ षटकांत ६ विकेट गमावत १५६ धावा करत सामना आपल्या नावावर केला. विजयाचा पाया रचताना युवराज सलारियाने ५१ चेंडूत ७४ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याला आयुष सुतारने ३४ चेंडूत ३४ धावा करत मोलाची साथ दिली. पर्पल संघाकडून यश विनोद भोईटेने ४८ धावांत २ विकेट घेतल्या.

 

नेहल चौहान सामन्याचा नायक

गोलंदाजीत ५/१५ अशी सामन्याला कलाटणी देणारी कामगिरी केल्याबद्दल नेहल चौहानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

संक्षिप्त धावफलक

एमसीसी पर्पल४० षटकांत ९ बाद १५४, (प्रिन्स कुमार ४३ (७६), आयुष गुप्ता ३० (५२); नेहल चौहान ५/१५) वि. एमसीसी गोल्ड२१.१ षटकांत ६ बाद १५६
(
युवराज सलारिया ७४ (५१), आयुष सुतार ३४ (३४); यश विनोद भोईटे २/४८)

 

निकाल : एमसीसी गोल्ड ४ विकेट राखून विजयी


सामनावीर : नेहल चौहान५/१५

 


Post a Comment

0 Comments