अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो
परिवारातर्फे पुण्यात शोकसभा
मुंबई, दि. ६ फेब्रुवारी – महाराष्ट्राचे क्रीडा नेतृत्व, महाराष्ट्र
खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दि.
२८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या
अकाली जाण्याने महाराष्ट्राने क्रीडा प्रेमी, कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा हक्काचा आधार असलेला नेता
गमावला आहे.
अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो
परिवारातर्फे रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नु. म. वि.
प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आप्पा बळवंत चौकाजवळ, बाजीराव रोड, पुणे येथे शोकसभेचे
आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेस खो-खो परिवारातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पुरस्कार्थी, क्रीडा
संघटक, खो-खो प्रेमी व सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित
राहावे, असे
आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत
जाधव यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments