Type Here to Get Search Results !

स्केचर्सचा भारतातील पिकलबॉलला दमदार वेग एआयपीएसोबत अधिकृत परफॉर्मन्स जर्सीचे लाँच सोनू कुमार विश्वकर्मा, वृशाली ठाकरे, अनुजा महेश्वरी आणि रितम चावला यांच्या उपस्थितीत पिकलबॉलला स्पर्धात्मक ओळख देण्याचा निर्धार पिकलबॉलच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात


 

स्केचर्सचा भारतातील पिकलबॉलला दमदार वेग एआयपीएसोबत अधिकृत परफॉर्मन्स जर्सीचे लाँच

सोनू कुमार विश्वकर्मा, वृशाली ठाकरे, अनुजा महेश्वरी आणि रितम चावला यांच्या उपस्थितीत पिकलबॉलला स्पर्धात्मक ओळख देण्याचा निर्धार

पिकलबॉलच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात

 

मुंबई : भारतातील झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल खेळाला आता जागतिक दर्जाची साथ लाभली आहे! द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्केचर्सने ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (एआयपीए) च्या सहकार्याने अधिकृत परफॉर्मन्स जर्सी लाँच करत देशातील पिकलबॉल चळवळीला नवी ऊर्जा दिली. हा उपक्रम केवळ फॅशन किंवा लाइफस्टाइलपुरता मर्यादित नसून पिकलबॉलला गंभीर, स्पर्धात्मक खेळ म्हणून स्थापित करण्याचा ठाम संदेश देणारा ठरला आहे.

 

तंत्रज्ञान, हलकेपणा आणि कोर्टवरील कमाल

नवीन स्केचर्स पिकलबॉल जर्सी ही उच्च-तीव्रतेच्या सामन्यांसाठी विशेष डिझाइन करण्यात आली आहे. हलक्या, श्वसनक्षम परफॉर्मन्स फॅब्रिकपासून तयार केलेली ही जर्सी उत्कृष्ट हालचाल स्वातंत्र्य, प्रभावी मॉइश्चर मॅनेजमेंट आणि दिवसभर आराम देणारी आहे. आधुनिक डिझाइन आणि तांत्रिक कार्यक्षमतेचा संगम साधत ही जर्सी स्पर्धात्मक खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन साकारण्यात आली आहे.

 

नामवंत खेळाडूंची प्रभावी साथ

या मोहिमेत सोनू कुमार विश्वकर्मा आणि वृशाली ठाकरे या स्केचर्स ब्रँड अॅम्बेसेडर्ससोबत आघाडीच्या पिकलबॉलपटू अनुजा महेश्वरी आणि रितम चावला यांची उपस्थिती विशेष ठरली. या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवत पिकलबॉलला व्यावसायिक दर्जा मिळवून दिला आहे. त्यांच्या सहभागामुळे स्केचर्सची ‘अ‍ॅथलीट-फर्स्ट’ तत्त्वज्ञान अधिक ठळकपणे अधोरेखित झाले.

 

स्पर्धात्मक दर्जा उंचावण्याचा निर्धार

स्केचर्स साऊथ एशिया प्रा. लि.चे सीईओ राहुल विरा म्हणाले, भारतामध्ये पिकलबॉल एका निर्णायक टप्प्यावर आहे. आम्हाला या खेळाची प्रचंड क्षमता दिसते. एआयपीएसोबतची आमची भागीदारी आणि विशेष जर्सीचे लाँच हे गंभीर स्पर्धात्मक खेळासाठी आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.” यासोबतच स्केचर्सने उत्कृष्ट ग्रिप, प्रतिसादक्षम कुशनिंग आणि स्थिरता देणाऱ्या उच्च-परफॉर्मन्स पिकलबॉल शूजची श्रेणीही सादर केली आहे.

 

वेगाने वाढणाऱ्या क्रीडा समुदायाला नवे बळ

या लाँचमुळे स्केचर्सने भारतातील आपल्या परफॉर्मन्स पोर्टफोलिओचा विस्तार करत देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्रीडा समुदायात भक्कम आणि विश्वासार्ह उपस्थिती निर्माण केली आहे. पिकलबॉल आता केवळ ट्रेंड नाही, तर स्पर्धात्मक उत्कर्षाचा नवा अध्याय ठरत आहे.


Post a Comment

0 Comments