आदिवासी हृदयातून उगवतेय भारताची नवी क्रीडा शक्ती!
‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स’मधून घडतायत चॅम्पियन्स -
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
जगदलपूर : परंपरेचा अभिमान, कौशल्याचा वारसा आणि आधुनिक क्रीडा मंचाची जोड या संगमातून
भारताची नवी क्रीडा क्रांती आकार घेत आहे! १ ली खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धा २०२६
ही केवळ स्पर्धा नसून आदिवासी युवकांच्या सशक्तीकरणाची,
प्रतिभा शोधाची आणि
राष्ट्रनिर्मितीची भक्कम चळवळ ठरत असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे
यांनी व्यक्त केले. रायपूर, जगदलपूर आणि सरगुजा येथे सुरू असलेल्या या ऐतिहासिक
स्पर्धेच्या पाहणीनंतर त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला.
३,८०० सहभागी, ९ क्रीडा प्रकार आणि १०६ सुवर्णांची शर्यत
या पहिल्यावहिल्या ट्रायबल स्पर्धेत सुमारे ३,८०० खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी सहभागी झाले असून ९ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा रंगत आहे. यात ७ पदक प्रकार व २ प्रात्यक्षिक प्रकार
समाविष्ट असून १०६ सुवर्ण पदकांसाठी चुरस पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा ‘मोरवीर’ हा शुभंकर भारतातील ७०० हून अधिक आदिवासी समुदायांच्या शौर्य,
अभिमान आणि परंपरेचे
प्रतीक ठरत आहे.
“खेळ म्हणजे सशक्तीकरणाचे साधन” – रक्षा खडसे
संवाद साधताना रक्षा खडसे म्हणाल्या, “खेळ हा केवळ स्पर्धा नसून आत्मविश्वास,
सशक्तीकरण आणि
राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी मार्ग आहे. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स ही भारताच्या
क्रीडा वारशाला पुनर्जीवित करणारी आणि प्रत्येक गावातून चॅम्पियन घडवणारी चळवळ
आहे.” त्यांनी स्पष्ट केले की या स्पर्धेमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील खेळाडूंना
राष्ट्रीय स्तरावर संधी मिळत आहे.
२०३६ ऑलिम्पिकचे स्वप्न;
२०४७ पर्यंत टॉप-५चे
लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचा उल्लेख करताना
खडसे म्हणाल्या की, भारताला २०३६ ऑलिम्पिकपर्यंत टॉप-१० क्रीडा राष्ट्र
बनवण्याचे आणि ‘विकसित भारत २०४७’पर्यंत टॉप-५ मध्ये स्थान मिळवण्याचे
ध्येय आहे. या ध्येयपूर्तीत खेलो इंडिया ट्रायबल गेम्ससारख्या उपक्रमांची महत्त्वाची
भूमिका असेल.
ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नवे व्यासपीठ
बस्तर ऑलिम्पिक आणि सरगुजा ऑलिम्पिकसारख्या उपक्रमांचा
उल्लेख करत खडसे यांनी सांगितले की, आदिवासी भागात आधीपासूनच मजबूत क्रीडा संस्कृती अस्तित्वात
आहे.
या स्पर्धेमुळे त्या प्रतिभेला योग्य दिशा आणि संधी मिळत
असून ग्रासरूट
स्तरावरून खेळाडू घडवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महिला सशक्तीकरणावर भर;
‘अस्मिता लीग्स’चा
प्रभाव
महिलांच्या सहभागाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,
‘अस्मिता
लीग्स’अंतर्गत १२४
लीग्समधून सुमारे १४,००० मुलींनी सहभाग नोंदवला आहे. फुटबॉल व हॉकीसारख्या खेळांमध्ये ग्रामीण व संवेदनशील
भागातील मुलींना संधी मिळत असून महिला सशक्तीकरणात खेळ मोठी भूमिका बजावत आहेत.
टॅलेंट हंटसाठी साई प्रशिक्षक मैदानात
स्पर्धेच्या प्रत्येक मैदानावर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI)
चे प्रशिक्षक नियुक्त
करण्यात आले आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना थेट खेलो इंडिया
योजनेत समाविष्ट करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याची प्रक्रिया सुरू
असल्याचे खडसे यांनी सांगितले.
परंपरेचा सन्मान; तीरंदाजीसारख्या खेळांचा गौरव
भारताच्या प्राचीन क्रीडा वारशाचा उल्लेख करत त्यांनी
सांगितले की, आदिवासी
समाज हा तीरंदाजीसारख्या पारंपरिक खेळांचा जनक व संवाहक राहिला आहे. हजारो वर्षांची ही परंपरा जपण्यासोबतच आधुनिक क्रीडा मंचावर
आणणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.
मान्यवरांची उपस्थिती; खेळाडूंशी थेट संवाद
जगदलपूर भेटीदरम्यान रक्षा खडसे यांच्यासोबत संजय पांडे (महापौर),
मयंक श्रीवास्तव (आयपीएस),
शलभ सिन्हा (आयपीएस),
आकाश छिकारा (आयएएस),
प्रतीक जैन (आयएएस),
ऋषिकेश तिवारी (एसडीएम),
तनुजा सलाम (क्रीडा
संचालक), ममता
श्री ओझा (खेलो इंडिया संचालक) व डोमन सिंह (आयुक्त,
बस्तर)
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी
खेळाडू,
प्रशिक्षक आणि
अधिकाऱ्यांशी संवाद साधत टॅलेंट शोध प्रक्रियेचा आढावा घेतला.

Post a Comment
0 Comments