आत्माराम मोरे स्मृती चषकासाठी महासंग्राम
जेजे विरुद्ध ब्रीच कॅन्डी सोमवारी आमनेसामने!
नरेश शिवतरकर विरुद्ध प्रदीप क्षीरसागर
शिवाजी पार्कवर रंगणार थरारक अंतिम लढत
मुंबई : क्रिकेटप्रेमींनो, सज्ज व्हा! चौकार-षटकारांचा वर्षाव,
अचूक गोलंदाजीचा मारा आणि रोमांचक क्षणांचा जल्लोष
अनुभवण्यासाठी आज ३० मार्च रोजी सकाळी ९.१५ वा. शिवाजी पार्क मैदानावर आत्माराम मोरे स्मृती चषकाच्या अंतिम लढतीचा महासंग्राम
रंगणार आहे. धडाकेबाज फलंदाज नरेश शिवतरकर यांच्या नेतृत्वाखालील जेजे हॉस्पिटल आणि अनुभवी प्रदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल यांच्यातील ही झुंज क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
स्पर्धेत तब्बल १४२ पुरस्कार आणि १३ रोख बक्षिसे देण्यात येणार असून, पारितोषिक वितरण गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते होणार आहे.
ब्रीच कॅन्डीची दमदार वाटचाल;
क्षीरसागरचा रणनीतीतून
विजयाचा मार्ग
“आम्ही प्रत्येक सामन्यात रणनीतीने खेळलो आणि आता ट्रॉफीवर
डोळा आहे,” असे आत्मविश्वासाने सांगणारे प्रदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे.
लीलावती हॉस्पिटल
आणि सोमैया हॉस्पिटलसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. संघात
रोहन महाडिक,
शंतनू मोरे,
अरुण परचा,
सुदेश यादव,
स्वप्नील कांबळे,
प्रफुल मारू
यांसारखे अष्टपैलू खेळाडू जबरदस्त फॉर्मात असून,
त्यांच्या एकत्रित कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास शिगेला
पोहोचला आहे.
जेजे हॉस्पिटलचा ‘डार्क हॉर्स’ अंदाज;
शिवतरकरचा धडाका
“आम्ही कोणालाही हरवू शकतो,
आणि ते मैदानावर
दाखवून दिले आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त करणारे नरेश शिवतरकर यांच्या नेतृत्वाखालील जेजे हॉस्पिटलने या स्पर्धेत ‘डार्क हॉर्स’ ठरत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
केईएम हॉस्पिटल,
बॉम्बे हॉस्पिटल
आणि रहेजा हॉस्पिटल यांसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करत त्यांनी अंतिम फेरी
गाठली. यापूर्वी गिरनार, आयडियल
स्पर्धेचे विजेतेपद देखील पटकाविले आहे. संघातील सुभाष शिवगण, प्रकाश सोळंकी, जगदीश वाघेला, अक्षय सावंत, वैभव नाईक, प्रवीण सोळंकी यांची आक्रमक फलंदाजी आणि निर्णायक क्षणी खेळ बदलण्याची
क्षमता ही जेजेची मोठी ताकद ठरत आहे.
मानाचा तृतीय क्रमांकाचा सामना आणि विशेष सन्मान
अंतिम सामन्यापूर्वी लीलावती हॉस्पिटल विरुद्ध रहेजा हॉस्पिटल
यांच्यात तृतीय क्रमांकासाठी लढत रंगणार असून,
नाणेफेक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या हस्ते होईल. याच वेळी रुग्णालयीन क्रिकेट
स्पर्धेतील योगदानासाठी हिंदुजा हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी जॉय चक्रबर्ती
यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
अंतिम लढतीकडे सर्वांचे लक्ष;
कोण उचलणार ट्रॉफी?
दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म,
आक्रमक खेळाडू आणि अनुभवी नेतृत्व पाहता आजची अंतिम लढत
अटीतटीची आणि हृदयाचा ठोका चुकवणारी ठरणार आहे. जेजे हॉस्पिटलचा धडाका की ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलची
रणनीती... कोण जिंकणार आत्माराम मोरे स्मृती चषक? याची उत्कंठा शिगेला पोहोचली असून,
सोमवारचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने जल्लोषाचा
ठरणार आहे!

Post a Comment
0 Comments