Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरीसाठी मुंबईचे वाघ सज्ज! ‘गादी’ आणि ‘माती’ संघाची दमदार घोषणा वाघोलीच्या रणांगणात १८ ते २२ मार्च दरम्यान मुंबईच्या मल्लांची गदा जिंकण्याची मोहीम मुंबईच्या मल्लांनी रणशिंग फुंकले

 


महाराष्ट्र केसरीसाठी मुंबईचे वाघ सज्ज!

‘गादी’ आणि ‘माती’ संघाची दमदार घोषणा

वाघोलीच्या रणांगणात १८ ते २२ मार्च दरम्यान मुंबईच्या मल्लांची गदा जिंकण्याची मोहीम

मुंबईच्या मल्लांनी रणशिंग फुंकले

 

मुंबई : कुस्तीविश्वात सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी मुंबई शहर तालीम संघाने आपले रणधुरंधर मैदानात उतरवले आहेत! पुण्याच्या वाघोलीत रंगणाऱ्या या महाकुंभासाठी निवडलेल्या मल्लांनी आता गदा जिंकण्याचा निर्धार करत संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान दिले आहे. ताकदडावपेच आणि जिद्दीच्या जोरावर मुंबईचे वाघ यंदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 

निवड चाचणीचा थरार : वडाळ्यातून संघ निश्चित

दिनांक १८ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान वाघोलीता. हवेलीपुणे येथे होणाऱ्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी लढत २०२५-२६ साठी मुंबईचा संघ निश्चित करण्यात आला. यासाठी नुकतीच भारतीय क्रीडा मंदिरवडाळा येथे चुरशीची निवड चाचणी पार पडली.
या चाचणीतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मल्लांची अधिकृत घोषणा सरचिटणीस श्री. प्रकाश शिवाजी तानवडे यांनी केली.

 

महाराष्ट्र केसरी गटात आघाडीचे दावेदार

गादी विभागात पै. उदय दत्तात्रय जोधळे तर माती विभागात पै. पार्थ सुरेश पाटील हे महाराष्ट्र केसरी गटात मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा सुंदर मिलाफ असलेल्या या संघाकडून यंदा मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

 

माती विभागातील निवडलेले मल्ल

५७ किलो – पै. प्रमोद आनंदा पाटील६१ किलो – पै. विघ्नेश्वर भगवान मेढकर६५ किलो – पै. महेश दत्तू गिते७० किलो – पै. मुलाणी साहिल मुबारक७४ किलो – पै. राकेश तानाजी पाटनेकर७९ किलो – पै. शिवतेज चंद्रकांत पाटील८६ किलो – पै. शुभम संजय शिंदे९२ किलो – पै. सुरज शंकर पाटील९७ किलो – पै. सचिन विलास महागांवकरमहाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ किलो) – पै. पार्थ सुरेश पाटील.

 

गादी विभागातील निवडलेले मल्ल

५७ किलो – पै. करण संजय पाटील६१ किलो – पै. जयदिप नामदेव बडरे६५ किलो – पै. नामदेव महादेव घाटगे७० किलो – पै. प्रतिक चंद्रकांत जाधव७४ किलो – पै. प्रदिप आप्पासो पाटील७९ किलो – पै. संकेत उत्तम शेणवी८६ किलो – पै. दिनेश भारत पवार९२ किलो – पै. शुभम भानुदास पाटील९७ किलो – पै. शुभम मारुती पवारमहाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ किलो) – पै. उदय दत्तात्रय जोधळे.

 

प्रशिक्षक व व्यवस्थापकांची भक्कम फळी

संघाला योग्य दिशा देण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात आली आहे.
गादी विभाग – मार्गदर्शक किशोर गोळेसंघ व्यवस्थापक आनंदा शिंदे
माती विभाग – मार्गदर्शक उदय दत्तात्रय जोधळेसंघ व्यवस्थापक रामचंद्र सखाराम पाटील या अनुभवी फळीच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा संघ अधिक भक्कमपणे मैदानात उतरणार आहे.

 

मुंबईच्या मल्लांकडून गदा जिंकण्याची अपेक्षा

मुंबई शहर तालीम संघाच्या या दमदार संघाकडून यंदा महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मुंबईत आणण्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुस्तीप्रेमींनीही सर्व मल्लांना शुभेच्छांचा वर्षाव करत विजयासाठी पाठिंबा दिला आहे. विजयी भव मुंबई!” – या जयघोषात आता वाघोलीच्या मातीवर इतिहास घडण्याची चाहूल लागली आहे!


Post a Comment

0 Comments