Type Here to Get Search Results !

फेडरेशन कप कबड्डीसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर पुरुष संघाचे नेतृत्व आकाश शिंदे, तर महिला संघाची धुरा समरीन बुरोंडकरकडे १९ ते २२ मार्च दरम्यान मध्य प्रदेशात रंगणार राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा

 


फेडरेशन कप कबड्डीसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

पुरुष संघाचे नेतृत्व आकाश शिंदे, तर महिला संघाची धुरा समरीन बुरोंडकरकडे

१९ ते २२ मार्च दरम्यान मध्य प्रदेशात रंगणार राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आगामी ५व्या वरिष्ठ गट फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी” आपल्या पुरुष व महिला संघांची दमदार घोषणा केली असून, राज्यातील अव्वल खेळाडूंना संधी देत संतुलित संघरचना उभी केली आहे. मध्य प्रदेशातील संता येथे दि. १९ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून, क्रीडाप्रेमींच्या नजरा आता या संघांच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.

 

पुरुष संघाची धुरा आकाश शिंदेकडे

पुरुष संघाचे नेतृत्व आकाश शिंदे (नाशिक) यांच्याकडे सोपविण्यात आले असून संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. संघात सुरज दूंदले (ठाणे), आकाश अरसूल (मुंबई उपनगर), सौरभ राऊत (अहमदनगर), संकेत सावंत (मुंबई शहर), सुरेश जाधव (पुणे), साईप्रसाद पाटील (कोल्हापूर), अजित चौहान (पुणे), आदित्य शशिकांत शिंदे (रत्नागिरी), आदित्य पोवार (कोल्हापूर), अनुज गावडे (पुणे), सौरभ फागरे (कोल्हापूर), साहिल राणे (मुंबई शहर) आणि अभिषेक गुंगे (सांगली) यांचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक निलेश शिंदे (मुंबई उपनगर) तर व्यवस्थापक भगीरथ पाटील (ठाणे) जबाबदारी सांभाळणार आहेत.

 

महिला संघाची कमान समरीन बुरोंडकरकडे

महिला संघाचे नेतृत्व समरीन बुरोंडकर (रत्नागिरी) हिच्याकडे सोपविण्यात आले असून संघात राज्यातील गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. संघात माधुरी गवंडी (ठाणे), कोमल देवकर (मुंबई उपनगर), तसनिम बुरोंडकर (रत्नागिरी), शुभदा खोत (मुंबई उपनगर), आम्रपाली गलांडे (पुणे), प्रतिक्षा तांडेल (मुंबई शहर), हर्षा शेट्टी (पुणे), याशिका पुजारी (मुंबई उपनगर), समृद्धी मोहिते (मुंबई उपनगर), निकिता पडवळ (पुणे), प्रणाली नागदेवता (मुंबई उपनगर), संजना भोईर (पालघर) आणि साक्षी सावंत (मुंबई शहर) यांचा समावेश आहे. संघाच्या प्रशिक्षिका मेघाली म्हसकर तर व्यवस्थापिका अश्विनी ईश्वलकर या जबाबदारी सांभाळणार आहेत.

 

विजेतेपदासाठी महाराष्ट्र सज्ज

दोन्ही संघांच्या निवडीमुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे. अनुभवी खेळाडूंसोबत तरुणाईचा जोश असलेले हे संघ स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपदावर झेंडा रोवतील, असा विश्वास क्रीडावर्तुळातून व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments