Type Here to Get Search Results !

राज्य कॅरम स्पर्धेत खळबळ विश्वविजेता प्रशांत मोरे पराभूत! ठाण्याच्या अफझल खानची सनसनाटी कामगिरी चौथ्या फेरीत प्रवेशासाठी रंगल्या चुरशीच्या लढती अफझल खानकडून विश्वविजेत्याला मात

 


राज्य कॅरम स्पर्धेत खळबळ

विश्वविजेता प्रशांत मोरे पराभूत!

ठाण्याच्या अफझल खानची सनसनाटी कामगिरी

चौथ्या फेरीत प्रवेशासाठी रंगल्या चुरशीच्या लढती

अफझल खानकडून विश्वविजेत्याला मात

 

मुंबई : मुंबईतील श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग येथे सुरू असलेल्या शिवशंकर उत्सव मंडळ आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मोठी खळबळ उडाली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत ठाण्याच्या अफझल खानने मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरे यांना २५-१९, ५-२५, २१-१७ अशा तीन सेटच्या रोमांचक लढतीत पराभूत करत स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदवला. पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर प्रशांत मोरे यांनी दुसरा सेट दणक्यात जिंकला, मात्र निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये अफझल खानने अचूक स्ट्राईक करत विजयी बाजी मारली.

 

सुखबिंदर कटनोरिया व कुणाल राऊतची आगेकूच

तिसऱ्या फेरीतील आणखी एका रंगतदार लढतीत पुण्याच्या सुखबिंदर कटनोरियाने मुंबईच्या किरण भोपनीकरचा १३-२४, १६-१०, २०-१८ असा कडवा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या कुणाल राऊतने मुंबई उपनगरच्या मुनियप्पन राजा यांना १०-१४, २५-१५, १८-१७ अशा चुरशीच्या संघर्षानंतर हरवत पुढील फेरी गाठली.

 

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीतील इतर निकाल

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीत अनेक खेळाडूंनी दमदार विजय नोंदवले. प्रफुल मोरे (मुंबई) यांनी विश्वजीत भावे (ठाणे) यांना २५-०१, १७-१० असे हरवले. दिनेश केदार (मुंबई) यांनी विश्वनाथ देवरुखकर (मुंबई उपनगर) यांच्यावर २२-१४, २५-११ असा विजय मिळवला. भारत कोळी (मुंबई) यांनी साईराम चक्का (मुंबई उपनगर) यांना २५-११, १६-२५, २०-१४ असे हरवले. प्रकाश गायकवाड (पुणे) यांनी दिलीप सोसा (मुंबई) यांना २५-०, २५-१२ असे नमवले. वैभव पवार (मुंबई) यांनी तन्मय खातू (रत्नागिरी) यांच्यावर २५-९, २५-१३ अशी मात केली. मंगेश पंडित (मुंबई उपनगर) यांनी रुद्र गवारे (मुंबई) यांना २५-१०, २५-१६ असे हरवले. ओंकार टिळक (मुंबई) यांनी लियाकत नागरजी (मुंबई) यांना २५-४, ९-२५, २५-१० असा पराभव दिला. मिहीर शेख (मुंबई) यांनी नागेश कलमकर (मुंबई) यांच्यावर २५-२, २५-० असा एकतर्फी विजय मिळवला. जितेश कदम (मुंबई उपनगर) यांनी किरण पवार (ठाणे) यांना २०-१७, २५-४ असे हरवले. संजय मणियार (मुंबई उपनगर) यांनी रिषिकेष जाधव (पुणे) यांना १७-४, २५-० असे नमवले. सार्थ मोरे (मुंबई) यांनी नितीन गांगुर्डे (मुंबई उपनगर) यांच्यावर १६-५, २५-८ अशी मात केली. तर संदीप दिवे (जळगाव) यांनी विनोद कांबळे (मुंबई) यांना २५-४, २५-२ असे हरवले.

 

अंतिम सामन्यांकडे लक्ष

स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून उद्या संध्याकाळी ४ वाजता महिला एकेरीचा अंतिम सामना, तर सायंकाळी ६ वाजता पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. राज्यातील अव्वल कॅरमपटूंमधील या निर्णायक लढतीकडे कॅरमप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 


Post a Comment

0 Comments