आमदार सचिनभाऊ अहिर चषक शालेय कॅरम स्पर्धेची रंगत २०
मार्चला!
१४ वर्षांखालील मुलामुलींसाठी विनाशुल्क स्पर्धा
१६ विजेत्यांना आकर्षक पुरस्कार
शालेय क्रीडा चळवळीला नवे बळ
मुंबई : मुंबईतील शालेय क्रीडा क्षेत्राला चालना देणारी
“आमदार सचिनभाऊ अहिर चषक” शालेय कॅरम स्पर्धा
यंदा पुन्हा रंगणार आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यांतील
१४ वर्षांखालील शालेय
मुलामुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे आयोजन २० मार्च रोजी परेल येथील आरएमएमएस
सभागृहात करण्यात आले आहे. शालेय स्तरावर कॅरम खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने
आयोजित या स्पर्धेबाबत क्रीडा क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सहकार्य
या स्पर्धेला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सहकार्य
लाभले असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना
तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन
मिळणार आहे. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या
पहिल्या १६ विजेते–उपविजेत्या
खेळाडूंना आकर्षक पुरस्कारांनी गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.
तंत्रशुद्ध खेळासाठी विशेष उपक्रम
सबज्युनियर गटातील खेळाडूंना तंत्रशुद्ध कॅरम खेळाची सवय लागावी आणि त्यांचा सरावात्मक
दर्जा उंचावावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय क्रीडा
चळवळीत सातत्याने योगदान देणारे आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याची
परंपरा संयोजकांनी यंदाही कायम ठेवली आहे.
चॅम्पियन कॅरम बोर्डावर सामने
स्पर्धेतील सर्व सामने चॅम्पियन कॅरम बोर्डावर खेळविण्यात येणार असून सहभागी खेळाडूंना
कॅरम स्ट्रायकरही मोफत उपलब्ध करून
देण्यात येणार आहेत. त्यामुळे नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधांसह खेळण्याची उत्तम
संधी मिळणार आहे.
प्रवेशासाठी १५ मार्चपर्यंत संपर्क
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्ज व
अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (मो. ९९८७८ ३१६२२)
यांच्याशी १५ मार्चपर्यंत संपर्क साधावा,
असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments