परळमध्ये शुक्रवारी रंगणार सचिनभाऊ अहिर चषक कॅरम स्पर्धेचा
थरार!
१४ वर्षाखालील ४८ खेळाडूंमध्ये अजिंक्यपदासाठी अटीतटीची लढत
नामांकित कॅरमपटूंची उपस्थिती
कॅरमच्या पटावर कौशल्याचा स्फोट!
मुंबई : मुंबईत
कॅरमप्रेमींसाठी उद्याचा दिवस खास ठरणार असून परळमधील आरएमएमएस सभागृहात
आमदार सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक
शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील तब्बल ४८ खेळाडू अजिंक्यपदासाठी जोरदार झुंज देणार आहेत.
अचूक फटके, वेगवान निर्णय आणि थरारक डावपेचांचा संगम असलेल्या या
स्पर्धेत प्रत्येक सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे.
उद्घाटन लढतीतच रंगणार थरार
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व राष्ट्रीय मिल मजदूर संघ
सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन संघाचे जनरल सेक्रेटरी
गोविंदराव मोहिते
यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या लढतीत
प्रसन्न गोळे विरुद्ध सुयश तोडकर
तसेच नील म्हात्रे विरुद्ध वरद कोल्हे यांच्यातील सामने रंगणार असून पहिल्याच क्षणापासून
स्पर्धेला उच्च दर्जाचा थरार लाभणार आहे.
विजेतेपदासाठी दिग्गजांमध्ये चुरस
विजेतेपदाच्या दावेदारीसाठी विविध शाळांतील अव्वल
कॅरमपटूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. प्रसन्न गोळे (पोद्दार अकॅडमी स्कूल),
उमैर पठाण (श्री
नारायण गुरु हायस्कूल), दुर्वेश चव्हाण (पार्ले टिळक विद्यालय),
नील म्हात्रे व सारा
देवन (पाटकर हायस्कूल), केवल कुळकर्णी (एसकेकेई हायस्कूल),
चैतन्य पोमेंडकर (हॉली
फॅमिली हायस्कूल), धृती राय व राशी कोटेचा (सीएनएम हायस्कूल),
वेदिका पोमेंडकर
(कनोसा हायस्कूल) आदी खेळाडू आपल्या अचूक फटक्यांनी प्रतिस्पर्ध्यांना कडवी
टक्कर देणार आहेत.
युवा कॅरमपटूंना मोठे व्यासपीठ
ही स्पर्धा नवोदित कॅरमपटूंना आपली कला सादर करण्यासाठी
प्रभावी व्यासपीठ ठरणार असून राज्यभरातील खेळाडूंना एकमेकांविरुद्ध खेळण्याची
सुवर्णसंधी मिळणार आहे. कौशल्य, संयम आणि अचूकतेच्या जोरावर कोणता खेळाडू विजेतेपदावर
शिक्कामोर्तब करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments