Type Here to Get Search Results !

शिवशंकर उत्सव मंडळातर्फे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचा जल्लोष! १३ ते १५ मार्च २०२६ दरम्यान श्रमिक जिमखान्यावर रंगणार राज्यस्तरीय थरार विजेत्यांसाठी ₹ एक लाख दहा हजारची रोख पारितोषिके

 


शिवशंकर उत्सव मंडळातर्फे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचा जल्लोष!

१३ ते १५ मार्च २०२६ दरम्यान श्रमिक जिमखान्यावर रंगणार राज्यस्तरीय थरार

विजेत्यांसाठी एक लाख दहा हजारची रोख पारितोषिके

 

मुंबई : कॅरमप्रेमींसाठी आनंदाची बातमी! कॅरमपटूंच्या कौशल्याचा थरार अनुभवायला मिळणार असून, शिवशंकर उत्सव मंडळाच्या वतीने १३ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत भव्य राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – ११ येथे रंगणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील अव्वल कॅरमपटू एकाच पटावर आपले कौशल्य दाखवणार आहेत.

 

                                                                       

क्रीडा प्रमुख - कृष्णकांत परब  व अध्यक्ष - शिवाजी किसन शिंदे

                      शिवशंकर उत्सव मंडळ 

       

स्पर्धेचे स्वरूप

यंदाची स्पर्धा दोन गटांमध्ये रंगणार असून राज्यातील नामांकित खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशी हि स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या ८ विजेत्यांना मिळून ,१०,००० इतकी रोख पारितोषिके तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला राज्यभरातील खेळाडूंकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

प्रवेश अर्ज व नावनोंदणी

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नाव नोंदणीसाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtracarromassociation.com उपलब्द असून  मुंबईतील खेळाडूंची नावे क्लबमार्फत स्वीकारली जाणार असून दिनांक ६ मार्च २०२६ पर्यंत  सायंकाळी ६ ते ८ यां कालावधीत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजाराणी चौकजवळ, शिवाजी पार्क येथे नोंदवावीत.

 

इतर जिल्ह्यांतील खेळाडूंसाठी सूचना

मुंबईबाहेरील खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या संबंधित जिल्हा कॅरम संघटनेमार्फत नावे नोंदवावीत, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी : ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

कॅरमपटूंमध्ये उत्सुकता

राज्य मानांकन स्पर्धेमुळे खेळाडूंना आपले मानांकन सुधारण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, मुंबईतील कॅरमप्रेमींनाही तीन दिवस दर्जेदार सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे राज्यातील कॅरमवर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 


Post a Comment

0 Comments