Type Here to Get Search Results !

राजा सुब्रमण्यमची ब्रेक्ससह दमदार सरशी सुमित नायडूचा आत्मविश्वासपूर्ण विजय सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत रंगल्या चुरशीच्या लढती

 


राजा सुब्रमण्यमची ब्रेक्ससह दमदार सरशी

सुमित नायडूचा आत्मविश्वासपूर्ण विजय

सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत रंगल्या चुरशीच्या लढती

 

मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठित क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) च्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत दुसऱ्या फेरीतील सामन्यांनी प्रेक्षकांना रोमांचित केले. शानदार ब्रेक्सच्या जोरावर व्ही. सुब्रमण्यम (राजा) यांनी प्रभावी विजय मिळवला, तर सुमित नायडूने अचूक पॉटिंगच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी मात करत पुढील फेरीत धडक मारली.

 

राजा सुब्रमण्यमचे ४९ आणि ४४ ब्रेक्स; कमटेवर विजय

दुसऱ्या फेरीतील सामन्यात व्ही. सुब्रमण्यम (राजा) यांनी गौरव कमटेवर ३-१ (५६-६२, ६७-५, ९५(४९)-१४, ७५(४४)-२५) असा शानदार विजय मिळवला. पहिली फ्रेम गमावल्यानंतर राजाने जोरदार पुनरागमन करत सलग तीन फ्रेम जिंकल्या. तिसऱ्या फ्रेममध्ये ४९ आणि चौथ्या फ्रेममध्ये ४४ अशा आकर्षक ब्रेक्स नोंदवत त्यांनी सामना आपल्या नावावर केला.

 

सुमित नायडूचा राजीव शर्मावर एकतर्फी विजय

दरम्यान, सुमित नायडूने उत्कृष्ट पॉटिंग आणि अचूक लाँग शॉट्सच्या जोरावर राजीव शर्माचा ३-० (७६-७, ८८-४०, ५४-२३) असा सहज पराभव केला. सामन्याच्या तिन्ही फ्रेममध्ये नायडूने पूर्ण वर्चस्व राखत आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर केला.

 

ओम सावंतचा कुशल गलैयावर थरारक विजय

दिवसातील अत्यंत रंगतदार सामन्यात ओम सावंतने कुशल गलैयावर ३-२ (६८-४४, ४७-४६, ५५-७०, २७-४८, ५३-३९) असा थरारक विजय मिळवला. सामना शेवटच्या फ्रेमपर्यंत रंगला आणि निर्णायक क्षणी सावंतने अचूक खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

विशाल गेहानी, इमरान खान, इब्राहिम शेख यांची दमदार कामगिरी

इतर सामन्यांत विशाल गेहानीने सय्यद रझावर ३-० (७३(४२)-१७, ५९-३९, ८६(३४)-३७) असा एकतर्फी विजय मिळवला. इमरान खानने तरुण संघानियाचा ३-० (८४-१९, ६९-१४, ५३-५०) असा पराभव केला, तर इब्राहिम शेखने चांगदेव पाचारणेवर ३-० (६३-९, ७७-३८, ५२-१७) अशी सहज सरशी केली.

 

मितुल पारेख, सतीश सिंग आणि महेश जगदाळेची विजयी आगेकूच

अन्य लढतींमध्ये मितुल पारेखने गौतम कर्नानीवर ३-० (७४-४४, ७३-४७, ५३-२६) अशी मात केली. सतीश सिंगने आझम खानचा ३-० (७४-१६, ६९-४३, ५४-२१) असा पराभव केला. तर महेश जगदाळेने पुनीत ठक्करवर ३-१ (७२-८, ६०-५०, ३८-४८, ५५-३१) असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

 

सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत दररोज रंगणाऱ्या अशा रोमांचक आणि उच्च दर्जाच्या लढतींमुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढत असून पुढील फेरीत आणखी थरारक सामने पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

 

फोटो कॅप्शन: सुमित नायडूने आत्मविश्वासपूर्ण पॉटिंग करत राजीव शर्मावर ३-० असा विजय मिळवला.


Post a Comment

0 Comments