सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६
सागर जैन व सिद्धार्थ टेंबेची विजयी सलामी
विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये थरारक लढती
सेल्वेल सॅम्युअलचा चुरशीचा विजय
मुंबई : मुंबईतील आयकॉनिक क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI)च्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू झालेल्या प्रतिष्ठित सीसीआय स्नूकर
क्लासिक २०२६ स्पर्धेला दमदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी खेळाडूंनी
उत्कृष्ट ब्रेक्स, चुरशीचे फ्रेम्स आणि थरारक लढतींचा वर्षाव करत प्रेक्षकांना
रोमांचित केले. या पहिल्या फेरीत सागर जैन आणि सिद्धार्थ टेंबे यांनी प्रभावी खेळ करत विजयी सलामी दिली, तर सेल्वेल सॅम्युअलने निर्णायक फ्रेम जिंकत संस्मरणीय विजय नोंदवला.
सागर जैनची दमदार सुरुवात; अर्धशतकी ब्रेकचा जलवा
पहिल्या फेरीतील सामन्यात सागर जैनने प्रतिस्पर्धी नवीन शंकरनारायणवर एकतर्फी वर्चस्व गाजवत ३-० (६२-२१, ६१-२८, ५९-३९) असा शानदार विजय मिळवला. पहिल्याच फ्रेममध्ये ५३ गुणांचा
अर्धशतकी ब्रेक नोंदवत जैनने सामन्यावर पकड मिळवली. अचूक शॉट्स आणि संयमी
खेळाच्या जोरावर त्याने पुढील दोन फ्रेम्सही जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित
केला.
सिद्धार्थ टेंबेची संघर्षपूर्ण विजयकथा
दुसऱ्या बोर्डवरील सामना अत्यंत रंगतदार ठरला. सिद्धार्थ टेंबेला जीत ठाकूरने कडवी झुंज दिली. पहिली फ्रेम गमावल्यानंतरही टेंबेने
जबरदस्त पुनरागमन करत ३-२ (३२-६२, ६०-३२, ६२-१०, ४०-७५, ६१-१८) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. निर्णायक
फ्रेममध्ये टेंबेने अचूक खेळ करत सामन्याचा शेवट आपल्या बाजूने झुकवला.
सेल्वेल सॅम्युअलचा निर्णायक फ्रेममध्ये विजय
पहिल्या फेरीतील आणखी एका चुरशीच्या सामन्यात सेल्वेल
सॅम्युअलने विजय लिलवावर ३-२ (५५-१६, ४३-५१, ६६-४३, ३१-५८, ७४-३२) अशी मात करत शानदार विजय मिळवला. दोन्ही
खेळाडूंमध्ये शेवटपर्यंत जोरदार लढत झाली. मात्र निर्णायक फ्रेममध्ये सॅम्युअलने उत्कृष्ट खेळ दाखवत विजय आपल्या नावावर केला.
रोहित खटावकरची दमदार कामगिरी
स्पर्धेतील आणखी एका सामन्यात रोहित खटावकरने मजहर अली रुवालावर ३-१ (४६-७१, ५१-२७, ५६-२०, ५४-४८) असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. पहिली
फ्रेम गमावल्यानंतरही खटावकरने संयम राखत सलग तीन फ्रेम्स जिंकल्या आणि सामन्यावर
आपली छाप सोडली.
पहिल्या फेरीचे निकाल
- सिद्धार्थ टेंबे विजयी वि. जीत ठाकूर – ३-२ (३२-६२, ६०-३२, ६२-१०, ४०-७५, ६१-१८)
- सागर जैन विजयी वि. नवीन शंकरनारायण
– ३-० (६२(५३)-२१, ६१-२८, ५९-३९)
- रोहित खटावकर विजयी वि. मजहर अली रुवाला
– ३-१ (४६-७१, ५१-२७, ५६-२०, ५४-४८)
- सेल्वेल सॅम्युअल विजयी वि. विजय लिलवा – ३-२ (५५-१६, ४३-५१, ६६-४३, ३१-५८, ७४-३२)
फोटो कॅप्शन : पहिल्या फेरीतील सामन्यात सेल्वेल सॅम्युअलने विजय लिलवावर ३-२ असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

Post a Comment
0 Comments