इनडोअर क्रिकेट जिल्हा पंच परीक्षा १ मे रोजी
ऑनलाईन प्रशिक्षणासह अधिकृत पंच बनण्याची संधी!!!
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू जितके महत्त्वाचे,
तितकाच एका बोटावर सामना फिरवणारा ‘पंच’ही निर्णायक ठरतो!
अचूक नजर,
नियमांची सखोल जाण आणि धाडसी निर्णयक्षमता असणाऱ्यांसाठी
आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा इनडोअर क्रिकेट असोसिएशन (MICA) तर्फे जिल्हा (L1) पंच प्रमाणपत्र कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून,
१ मे २०२६ रोजी ही परीक्षा होणार आहे.
नोंदणी व सवलत योजना :
नोंदणी प्रक्रिया सुरू असून १३ ते १८ एप्रिलदरम्यान नोंदणी
करणाऱ्यांना ५००/- रुपये सवलतीचे शुल्क लागू आहे, तर १९ ते २५ एप्रिलदरम्यान शुल्क १०००/- रुपये असेल. २६
एप्रिल रोजी अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी https://mahaindoorcricket.com/umpire-registration/
या संकेतस्थळावर
जाऊन आपली नोंदणी निश्चित करा.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन :
२७ ते ३० एप्रिलदरम्यान दररोज रात्री ८.३० वाजता ऑनलाईन
सत्रांद्वारे पंच परीक्षेचे बारकावे
शिकवले जातील.
परीक्षा व संधी :
१ मे रोजी परीक्षा तर ३ मे रोजी निकाल जाहीर होईल. यशस्वी
उमेदवारांना विविध स्पर्धांमध्ये अधिकृत पंच म्हणून संधी मिळणार आहे.

Post a Comment
0 Comments