Type Here to Get Search Results !

आळंदीत राष्ट्रीय कबड्डीचा जल्लोष! ३५ वी सब ज्युनिअर स्पर्धा दणदणीत यशस्वी विदर्भ व हरियाणा अव्वल महाराष्ट्राची दुहेरी उपविजेतेपदाची कामगिरी आळंदीने अनुभवला राष्ट्रीय कबड्डीचा थरार

 


आळंदीत राष्ट्रीय कबड्डीचा जल्लोष! 

३५ वी सब ज्युनिअर स्पर्धा दणदणीत यशस्वी
विदर्भ व हरियाणा अव्वल

महाराष्ट्राची दुहेरी उपविजेतेपदाची कामगिरी

आळंदीने अनुभवला राष्ट्रीय कबड्डीचा थरार

पुणे : आळंदी नगरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ३५ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर कबड्डी स्पर्धेने अक्षरशः क्रीडारसिकांना वेड लावले! तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातील अव्वल खेळाडूंनी दमदार कामगिरी करत मैदान दणाणून सोडले. श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या २८ आणि मुलींच्या १९ संघांनी सहभाग घेत चुरशीचे सामने रंगवले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले.

 

भव्य आयोजन : अनेक संस्थांचा संयुक्त पुढाकार

या स्पर्धेचे आयोजन ॲम्यचुअर फेडरेशन ऑफ इंडिया, ॲम्यचुअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा ॲम्यचुअर कबड्डी फाऊंडेशन, आळंदी नगरपालिका आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रथमच आळंदीत होत असल्याने आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन करत सर्वांची मने जिंकली.

 

निकाल : विजेत्यांचा दमदार दबदबा


मुलांच्या गटात प्रथम क्रमांक – विदर्भ, द्वितीय क्रमांक – महाराष्ट्र, तृतीय क्रमांक – कर्नाटक आणि आसाम

 

मुलींच्या गटात : प्रथम क्रमांक – हरियाणा, द्वितीय क्रमांक – महाराष्ट्र, तृतीय क्रमांक – राजस्थान आणि झारखंड


महाराष्ट्राने दोन्ही गटात उपविजेतेपद पटकावत सातत्यपूर्ण कामगिरीची छाप पाडली, तर विदर्भ व हरियाणा संघांनी विजेतेपद मिळवत आपला दबदबा सिद्ध केला.

 

पारितोषिक वितरण : मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा

पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रास्ताविक प्रा. अशोक देवकर यांनी केले. यावेळी आमदार बाबाजी काळे, आमदार जयंत आसगावकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, जागतिक कबड्डी महासंघाचे अध्यक्ष एड. ए. उशी. रेड्डी, अजित वडगावकर, सुधीर मुंगसे, विजयसिंह शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजेत्या संघांना चषक, पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

 

नियोजनाचा गाभा : पडद्यामागील मेहनतींचा मोठा वाटा

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे अनेक कार्यकर्त्यांची मेहनत होती. किरण गुंजाळ, चंद्रकांत डीकले (तांत्रिक/पंच समिती), दादासाहेब देशमुख, मते सर (मैदान व्यवस्था), श्रुती जाडर, रामा रणदिवे, प्रथमेश जाधव (निवास व्यवस्था), विजय बोदडे, भागवत वानखडे (भोजन व्यवस्था), गणेश म्हस्के, चंद्रकांत तोरणे (स्टेज व्यवस्था) यांनी उत्कृष्ट काम पाहिले. स्वयंसेवकांमध्ये गोपिका फड, शुभम वाझे, अनुजा मुसळे यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.

 

विशेष योगदान : सुयश कुऱ्हाडे यांची धडपड ठरली निर्णायक

सहसचिव सुयश कुऱ्हाडे यांनी स्पर्धेदरम्यान आलेल्या प्रत्येक अडचणीवर तत्परतेने उपाय करत आयोजन सुरळीत पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याचबरोबर प्रशांत दादा कुऱ्हाडे व आळंदी नगरपरिषदेच्या सर्व सदस्यांनी दिलेले सहकार्य विशेष ठरले.

 

मोठी घोषणा : आळंदीत जागतिक स्पर्धेची शक्यता!

वसुधैव कुटुंबकमया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारसरणीचा वारसा जपत भविष्यात आळंदीत जागतिक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर ए. उशी. रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “पुढील जागतिक स्पर्धा आळंदीत घेऊ” अशी मोठी घोषणा केली, तर नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

 

समारोप : सहकार्याबद्दल कृतज्ञता

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले, तर राज्याच्या सचिव सौ. भारती जगताप यांनी आभार मानले. या स्पर्धेच्या यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे व क्रीडाप्रेमींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. आळंदीतील ही राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा केवळ एक क्रीडा स्पर्धा न ठरता, भविष्यातील भव्य क्रीडा आयोजनासाठी प्रेरणादायी ठरली!


Post a Comment

0 Comments