Type Here to Get Search Results !

टागोर नगर श्री २०२६ अजय कडूचा दणदणीत विजय! ताडदेव जिमचा अजय कडू मानकरी ‘बेस्ट पोझर’ किताब विजय गोडसेच्या नावावर विक्रोळीत स्नायूंचा जल्लोष!


टागोर नगर श्री २०२६

अजय कडूचा दणदणीत विजय!

ताडदेव जिमचा अजय कडू मानकरी

बेस्ट पोझर’ किताब विजय गोडसेच्या नावावर

विक्रोळीत स्नायूंचा जल्लोष!

 

मुंबई : विक्रोळीच्या टागोर नगरमध्ये शरीरसौष्ठवाचा थरार उसळला आणि पीळदार स्नायूंनी भरलेला मंच दणाणून गेला! टागोर नगर मित्र मंडळ व्यायामशाळा आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ मध्ये ताडदेव जिमचा अजय कडू याने सर्वांवर मात करत प्रतिष्ठेचा टागोर नगर श्री २०२६’ किताब पटकावला. तर आपल्या आकर्षक पोझिंगने प्रेक्षकांना भुरळ घालत पेतीत (Petit) जिमचा विजय गोडसे याने बेस्ट पोझर’ हा मानाचा किताब जिंकला.

 

अजय कडूचा पीळदार पराक्रम

अत्यंत चुरशीच्या लढतीत अजय कडू याने आपल्या संतुलित शरीरयष्टी, प्रभावी पोजिंग आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ‘टागोर नगर श्री’चा किताब पटकावला. सुपर टॉल गटात वर्चस्व गाजवत त्याने अंतिम फेरीतही आपली छाप सोडली.

 

विजय गोडसे ठरला ‘बेस्ट पोझर’

स्पर्धेतील आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे विजय गोडसे याचे पोजिंग. पेतीत जिमचा विजय गोडसे याने आपल्या लयबद्ध, अचूक आणि आकर्षक पोझिंगने परीक्षकांसह प्रेक्षकांची मने जिंकत बेस्ट पोझर’ किताब पटकावला.

 

विक्रोळीत रंगला राज्यस्तरीय सोहळा

ऍम्युचर बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने टागोर नगर मित्र मंडळाने कबड्डी स्पर्धेनंतर या भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. विक्रोळी (पूर्व) येथील साईबाबा मंदिराजवळील मैदानात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामांकित शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. त्यामुळे प्रत्येक गटात चुरशीची लढत पाहायला मिळाली.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नगरसेवक राजेश सोनावळे, मंडळाचे अध्यक्ष मनोज पवार, कार्याध्यक्ष गिरीश पवार, सचिव सुरेश परब, कोषाध्यक्ष महेंद्र भास्कर यांच्या उपस्थितीत पार पडला. आयोजकांच्या नियोजनामुळे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.

 

गटनिहाय निकाल – दमदार कामगिरीची सलग नोंद

शॉर्ट ग्रुप (१६५ से.मी. खालील) : १. कौस्तुभ राणे (संजीवनी जिम), २. सुरेंद्र डांगवळ (अल्फा जिम), ३. अविनाश राजपूत

 

मेडियम ग्रुप (१६५ ते १७० से.मी.) : १. मुकुंद मांजरेकर (संजीवनी जिम), २. निहाल भुवड (प्रेरणा जिम), ३. अविनाश गोरीवले (प्रेरणा जिम)

 

टॉल ग्रुप (१७० ते १७५ से.मी.) : १. शार्दूल हरियान (हनुमान सेवा मंडळ), २. रेंडोल्फ डिसोझा (हनुमान सेवा मंडळ), ३. अमित निकम (सम्राट व्ही. एस.)

 

सुपर टॉल ग्रुप (१७५ से.मी. वरील) : १. अजय कडू (ताडदेव जिम), २. प्रशांत कांबळे (शेट्येज जिम), ३. कार्तिक शेलटकर (हनुमान सेवा मंडळ)

 

टागोर नगरमध्ये रंगलेल्या या स्पर्धेने पुन्हा एकदा सिद्ध केले की मुंबई आणि महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाची परंपरा अधिक बळकट होत आहे आणि नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे!


Post a Comment

0 Comments