एल.आय.सी.कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत आरव सेठीची हॅट्ट्रिक..!
मुंबई ... न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित ३४ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात वाशी सेंटरचा मध्यमगती गोलंदाज आरव सेठी याने अफलातून गोलंदाजी करत हॅट्ट्रिकसह सहा बळी घेत घाटकोपर सेंटरचा दुसऱ्या डावात ११९/धावांत खुर्दा उडवला आणि त्यांना फॉलोऑन दिला. दादर पारशी येथील रमेश दडकर मैदानावर झालेल्या या सामन्यात दिवसअखेर वाशी सेंटरने ५ बाद १७३ धावा करुन निर्णायक पराभव टाळला.
ठाणे सेंटरने बदलापूर सेंटरवर दणदणीत विजय मिळवला. माटुंगा जिमखाना मैदानावर झालेल्या या सामन्यात तनय महांसारिया याने ३४ धावांत ८ बळी घेत शानदार कामगिरी केली.
डोंबिवली सेंटरने कल्याण सेंटरवर 92 धावांनी विजय मिळवला. डीपीझेड, माटुंगा येथे झालेल्या या सामन्यात कल्याण सेंटरच्या डावखुरा फिरकीपटू दर्शन राठोड याने सामन्यात ११ बळी घेतले मात्र त्याची ही कामगिरी संघाचा पराभव टाळु शकली नाही. ब गटातील सामन्यात पुन्हा एकदा एमसीए अकादमीच्या राजवीर लाडने सुरेख मारा करुन प्रतिस्पर्धा माटुंगा केंद्राचे पहिल्या डावात ५१ धावांत ६ बळी टिपले.त्याला चौधरीने देखील ४ बळी घेऊन चांगली साथ दिली. पण एमसीए अकादमीने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर माटुंगा केंद्राचा पराभव केला.
दुसरी फेरी – संक्षिप्त धावफलक...
🔹 अ गट...
१. बोरिवली केंद्र vs कांदिवली केंद्र
बोरिवली केंद्र : ७१.२ षटकांत २०६ (आर्यन खोत ६१,अर्णव भुजबळने ४/११,श्रेयस नाईक ३/५१) आणि २० षटकांत २ बाद ९२ (लक्ष्मणप्रसाद रायन शेख ४७, अंश सोनावळे ३६) पहिल्या डावावर विजयी कांदिवली केंद्र : ७८ षटकांत २०१ सर्वबाद (अगस्त्य काशिकरने ९७, श्रेयश खिलारेने ६०,लक्ष्मणप्रसाद विश्वकर्माने ४/१०)
सामनावीर : लक्ष्मणप्रसाद विश्वकर्मा
२. चर्चगेट केंद्र vs कांदिवली केंद्र
चर्चगेट केंद्र: ८१.३ षटकांत ६ बाद ३५४ डाव घोषित (शार्दुल फगारेने शानदार १५५, आरुष कोल्हेने १०९) आणि ८ षटकात ३३/१) पहिल्या डावावर विजयी कांदिवली केंद्र: ५४.१ षटकांत १७० (संचित गावडेने ८५, अवधूत रावळने ५०, निखिल गुरवने ३/३७, अर्जुन भोसलेने ३/४१)
सामनावीर : शार्दुल फगारे
🔹 ब गट....
१. एम.सी.ए.अकादमी केंद्र vs माटुंगा केंद्र
एम.सी.ए.अकादमी केंद्र: ४६.२ षटकात १९५ (अक्षत जोशी३३,अमितेश गावंडे ३१, आदित्य पांडे ६/६८) आणि ४८.१ षटकांत ८ बाद १८२ डाव घोषित (अर्जुन दादरळार ५३, अक्षत जोशी ५१, देवाशीष घोडके ३१,आदित्य पांडे ३/७९) पहिल्या डावावर विजयी माटुंगा केंद्र: ४६.३ षटकात ११२ धावांत सर्वबाद (नीव जेठवानी ४२, राजवीर लाड ६/५१, अद्वय चौधरी४/१०)
सामनावीर : आदित्य पांडे
२. घाटकोपर केंद्र vs वाशी केंद्र
वाशी केंद्र: ८१.४ षटकांत २२६ (समीक्ष नायरने ६०, वेदांग मिश्रा ४४, ईशान यादवने ३५,अद्वित तिवारीने ३/४८) घाटकोपर केंद्र: ३६ षटकांत ११९ धावांत सर्वबाद (आरव सेठीने हॅट्ट्रिकसह ६/२९) आणि ३५ षटकांत ५ बाद १७३ (शिवम सिंगने ६९ ,निशाद परबने ४/४१)
सामनावीर : आरव सेठी
🔹 क गट...
१. डोंबिवली केंद्र vs कल्याण केंद्र
डोंबिवली केंद्र: ३८.२ षटकात १२० (रैयान खान ३४, स्मित पोमेंडकर ३२, दर्शन राठोड ५/३४ ).आणि ३९.२ षटकात १६५ (अक्षांश सिंगने ५९) विजयी विरुद्ध कल्याण केंद्र: २३.४ षटकात १०५ आणि २५.४ षटकात८९ (सार्थ पाटील ३१, स्वरूप आंब्रे ५/११)
सामनावीर : अक्षांश सिंग
२. ठाणे केंद्र vs बदलापूर केंद्र
बदलापूर केंद्र: ३५.१ षटकात ११६ (प्रज्ञान भोसले ३२, तन्मय महन्सारिया ४/३४, सर्वेश भोईर३/६) आणि १९.३ षटकात ५५ (तन्मय महन्सारिया ४/०) पराभूत विरुद्ध ठाणे केंद्र: ७१.४ षटकांत ३४३ (नीव जेठवानी ९८, अथर्व गावडे ६२, आर्यन पवार ४७,पार्थ राणे ३८)
सामनावीर : तनय महन्सारिया
🔹 ड गट. ...
१. पालघर केंद्र vs विरार केंद्र
विरार केंद्र: ८१ षटकांत ७ बाद २६४ (ओंकार नाईक ९८, उमर खुटेने ४९, तर गोलू पाल नाबाद ४४) पालघर केंद्र:३९.२ षटकात १२१ धावांत सर्वबाद (अर्हान पटेल ४७, प्रवीर सिंग ५/३३,गोलू पाल ४/३३) आणि ३३ षटकांत ८ बाद १०० (गोलू पाल पुन्हा ५/३३)
सामनावीर : गोलू पाल
२. बोईसर केंद्र vs मीरा रोड केंद्र
मीरा रोड केंद्र: ४१.३ षटकात १२१ धावांत (हृदान मिश्रा ३३, श्लोक चौधरी५/२१) आणि ४८ षटकांत ८ बाद १८७ (स्मित केरकर नाबाद ५९ ,अनय वाडेकर ४०) बोईसर केंद्र: ५८.२ षटकात २१८ (विहंग आक्रे ५१, आश्मिक पाटील ४९, अमीर शेख ३३, स्मित केरकर ५/५९, अहिल अली सय्यद ४/४६)
सामनावीर : स्मित केरकर
Post a Comment
0 Comments