Type Here to Get Search Results !

No title

 मनोरा बॅडमिंटन स्पर्धेत

*काव्या, हिमांशुला दुहेरी मुकुट*


मुंबई : मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने नुकत्याच मलबार हिल क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ ते १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत काव्या सर्वाना कुमार, हिमांशू भाटकरने शानदार खेळ करत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. काव्याने मुलींच्या ११ आणि १३ वर्षाखालील तर हिमांशूने मुलांच्या १५, १७ वर्षाखालील गटात विजेते पदाचा मान मिळवला. मनोरा बॅडमिंटन अकादमीची ही ११९ वी स्पर्धा होती. राज्यभरातून १०० पेक्षा जास्त खेळाडूंचा प्रतिसाद स्पर्धेला मिळाला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मलबार हिल क्लबचे बॅडमिंटन खेळाचे चेअरमन सोहम दारुवाला यांच्या हस्ते संपन्न झाला. मनोरा बॅडमिंटन अकादमीचे संचालक मनोहर गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली.


*स्पर्धेचा अंतिम निकाल*

११ वर्षाखालील मुली : काव्या सवर्ना कुमार वि. वि. द्विशा मंडाले, १३ वर्षाखालील काव्या सवर्ना कुमार वि. वि. स्मृती पिल्लांई, १५ वर्षाखालील विनीता असरानी वि. वि. आरोही म्हात्रे.


मुले

११ वर्षाखालील मुले : जिहान घिया वि.वि. रुहान बडे, १३ वर्षाखालील अजिंक्य देसाई वि. वि. देवांनी पांडे, १५ वर्षाखालील हिमांशू भाटकर वि. वि. काव्या परमार, १७ वर्षाखालील हिमांशू भाटकर वि. वि. काव्या परमार.

Post a Comment

0 Comments