किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची ऐतिहासिक
भागीदारी
भारतीय टेनिसला नवी ऊर्जा!
तळागाळातील टेनिस विकासाला मोठी चालना
पुढील काही वर्षांत १२० हून अधिक युवा
टेनिसपटूंना घडवण्याचा संकल्प
भारतीय टेनिससाठी मोठी घोषणा
मुंबईत : मुंबईत भारतीय टेनिसविश्वासाठी अत्यंत महत्त्वाची आणि उत्साहवर्धक घोषणा करण्यात आली असून किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीग (TPL) यांनी तीन वर्षांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. या करारानुसार किया इंडिया आता टीपीएलचा एक्सक्लुझिव्ह स्पॉन्सर म्हणून सहभागी होणार आहे. जागतिक स्तरावर टेनिसशी मजबूत नाते असलेल्या किया इंडियाने भारतीय टेनिसच्या वाढत्या इकोसिस्टमला पाठिंबा देत देशभरातील युवा पिढीपर्यंत टेनिसचा प्रभाव आणि पोहोच वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तळागाळातील टेनिसला मिळणार मोठे बळ
या बहुवर्षीय भागीदारीमुळे भारतीय टेनिसच्या तळागाळातील
विकासाला मोठी चालना मिळणार आहे. टेनिस प्रीमियर लीग आणि त्याच्या टीपीएल अॅपच्या माध्यमातून देशभरात नव्या प्रतिभांचा शोध घेणे, स्पर्धांचे आयोजन करणे आणि युवा खेळाडूंना
व्यासपीठ उपलब्ध करून देणे यावर भर दिला जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत टीपीएलने “रेस टू गोल्ड स्कॉलरशिप” उपक्रमाद्वारे देशातील ८० हून अधिक युवा टेनिसपटूंना मदत केली असून, आता किया इंडियाच्या सहकार्यामुळे हा आकडा १२० पेक्षा अधिक करण्याचे लक्ष्य
ठेवण्यात आले आहे.
जागतिक टेनिसशी मजबूत नाते
किया इंडियाने ऑस्ट्रेलियन ओपनसोबतच्या तब्बल २५ वर्षांच्या जागतिक संबंधांमुळे टेनिस क्षेत्रात आपली वेगळी
ओळख निर्माण केली आहे. युवा सहभाग वाढवणे आणि खेळाभोवती अर्थपूर्ण अनुभव निर्माण
करणे हा कंपनीचा मुख्य उद्देश राहिला आहे. या भागीदारीमुळे किया इंडियाची ब्रँडिंग
टीपीएल अॅप तसेच सर्व ८ फ्रँचायझी संघांच्या जर्सीवर झळकणार आहे.
स्टार खेळाडू आणि सेलिब्रिटींचा पाठिंबा
ऑल इंडिया टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली टीपीएलने यशस्वीपणे ७ हंगाम पूर्ण केले
आहेत. लीगला लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांसारख्या दिग्गज ब्रँड अॅम्बेसेडर्सचा पाठिंबा
लाभला आहे. तसेच सोनाली बेंद्रे बहल आणि रकुल प्रीत सिंह यांसारख्या सेलिब्रिटींच्या सहभागामुळे लीगची
लोकप्रियता आणखी वाढली आहे. जिओ हॉटस्टारवर थेट प्रक्षेपणामुळे टीपीएल भारतातील सर्वात प्रभावी
नॉन-क्रिकेट क्रीडा लीगपैकी एक ठरली आहे.
भारतीय टेनिसच्या भविष्यासाठी मोठे पाऊल
टीपीएलचे सह-संस्थापक कुणाल ठक्कर आणि मृणाल जैन यांनी या भागीदारीला भारतीय टेनिसच्या
भविष्यासाठी ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे. तर किया इंडियाचे अतुल सूद यांनी खेळ
लोकांना प्रेरणा देतो आणि सांस्कृतिक संबंध निर्माण करतो असे सांगत, भारतीय टेनिसला अधिक व्यापक स्तरावर नेण्यासाठी
कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
१८ वेळा ग्रँडस्लॅम विजेते लिएंडर पेस यांनीही या
भागीदारीचे स्वागत करत, भारतीय टेनिसच्या दीर्घकालीन विकासासाठी अशा सहकार्यांची
अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments