कुमार-मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व
निवड चाचणी खो-खो स्पर्धा
शिवनेरी व ॐ साईश्वरला अजिंक्यपद
स्पर्धेत ॐ साईश्वरचा प्रशिक मोरे व शिवनेरीची आरुषी
गुप्ता अष्टपैलू
मुंबई : माटुंगा येथील ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या क्रीडांगणावर रंगलेल्या
कुमार-मुली (ज्युनिअर – १८ वर्षाखालील) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो
स्पर्धा २०२६-२७ मध्ये अखेर शिवनेरी सेवा मंडळ आणि ॐ साईश्वर सेवा मंडळ यांनी आपला दबदबा सिद्ध करत अजिंक्यपदावर नाव कोरले. मुंबई खो-खो संघटनेच्या
मान्यतेने आयोजित या स्पर्धेच्या अंतिम दिवशी रंगलेल्या थरारक सामन्यांनी
प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. मुली गटात शिवनेरी सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिरवर मात केली, तर कुमार गटात ॐ साईश्वर सेवा मंडळाने सरस्वती
स्पोर्ट्स क्लबला नमवत सलग दुसऱ्या वर्षी
विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करताना ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचे
अध्यक्ष उन्मेश नरवणे आणि त्यांच्या
सहकाऱ्यांनी खो-खो खेळासाठी केलेले योगदान विशेष ठरले. सलग सब-ज्युनिअर आणि
ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन करत त्यांनी खेळाडू व प्रेक्षकांना
वेगळाच अनुभव दिला.
मुलींच्या अंतिम फेरीत शिवनेरीचा थरारक विजय
मुली गटाच्या अंतिम सामन्यात शिवनेरी
सेवा मंडळाने श्री समर्थ व्या. मंदिरचा ४-३ (मध्यंतर ३-१) असा ५.१० मि. राखून १
गुणाने धुव्वा उडवत अजिंक्यपद मिळवले. शिवनेरीने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व
राखत श्री समर्थला पुनरागमनाची संधीच दिली नाही. शिवनेरीच्या आरुषी गुप्ता (५.४०, नाबाद १.५० मि. संरक्षण), मुस्कान शेख (५. मि. संरक्षण), सिद्धी शिंदे (नाबाद ३.२०, २.१० मि. संरक्षण व १ गुण), त्रिशा गुप्ता (२ गुण) गार्गी काडगे (१ गुण)
यांनी संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. तर पराभूत श्री समर्थच्या खुशी यादव (४.४०, मि. संरक्षण व २ गुण ), सोनम शेलार (२.५० मि. संरक्षण १ गुण ), आस्था महाडिक (२.२०, संरक्षण), ग्रंथा वारघडे
(१.२० मि. संरक्षण ) यांनी दमदार कामगिरी केली मात्र त्या संघाला विजयाचा
मुकुट प्रदान करू शकल्या नाहीत
कुमार गटात ॐ साईश्वरची सलग दुसऱ्या वर्षी बाजी
कुमार गटाच्या अंतिम सामन्यात ॐ साईश्वर सेवा मंडळाने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा १०-९ (मध्यंतर ५-४) असा
१.५० मि. राखून १ गुणाने पराभव करत अजिंक्यपदावर नाव कोरले. ॐ साईश्वर सेवा मंडळाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत आम्हीच बॉस असल्याचे
दाखवून देत सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपदाला गवसणी घातली. ॐ साईश्वरच्या प्रशिक मोरे (२.१०, ३ मि. संरक्षण व ३ गुण), निषाद ताम्हणकर (३ मि. संरक्षण व १ गुण ), सार्थक माडीये (२.४०, नाबाद १.४० मि. संरक्षण ), अधिराज गुरव (१.३० मि. संरक्षण १ गुण), आयुष
जाधव (१.२०. मि. संरक्षण १ गुण ) व आदित्य राणे (२ गुण) यांनी संघाला
अजिंक्यपद मिळवून देताना दमदार कामगिरी केली. तर पराभूत सरस्वतीच्या वरुण
गुप्ता (३.२०, २.२० मि. संरक्षण व २ गुण), ओम ननावरे (१.२०, १.४० संरक्षण व २ गुण), समर्थ उपशेटे (१.४०, १ मि. संरक्षण व १ गुण), ओमकार खरंगटे (१. मि. संरक्षण व २ गुण) व साई
तुळसणकर (१.१० मि. संरक्षण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही.
तृतीय क्रमांकासाठीही चुरस
मुली गटातील तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ॐ साईश्वर सेवा मंडळाने ॐ समर्थ भारत व्यायाम
मंदिरचा ५-३ असा ४० सेकंद राखून २ गुणांनी पराभव केला. तर कुमार गटातील तृतीय
क्रमांकाच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम
मंदिराने विद्यार्थी क्रीडा केंद्रचा ४-३ असा २.१० मि. राखून १ गुणाने पराभव करत तिसरे स्थान पटकावले.
उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रशिक्षकांचा गौरव महाराष्ट्र क्रीडा
विकास फाऊंडेशनतर्फे करण्यात आला. कै. वि. वि. करमकर यांच्या स्मरणार्थ प्रशिक्षक राकेश कदम (शिवनेरी – मुली गट) आणि भूपेश गायकवाड (ॐ साईश्वर – कुमार गट) यांना प्रत्येकी रु. ३ हजारांचे
पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरतर्फे प्रथम चार संघांना रोख पारितोषिके आणि
चषक प्रदान करण्यात आले. अध्यक्ष उन्मेश नरवणे यांनी काही उभरत्या खेळाडूंनाही विशेष रोख पारितोषिके देऊन प्रोत्साहन दिले.
दिमाखदार बक्षीस वितरण समारंभ
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार महेश सावंत, महाराष्ट्र क्रीडा विकास फाऊंडेशनचे रवी मांद्रेकर, बाळ वाडवलीकर, ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचे अध्यक्ष उन्मेश नरवणे, प्रकाश नकाशे (सेक्रेटरी – महाराष्ट्र ॲम.
स्पोर्ट्स असो.), ॲड. अरुण देशमुख, बाळासाहेब तोरसकर, सुधाकर राऊळ, सुरेंद्र विश्वकर्मा, नितीन पाष्टे आणि विकास पाटील यांच्या
उपस्थितीत उत्साहात पार पडला.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
कुमार गट मुली गट
अष्टपैलू खेळाडू – प्रशिक मोरे (ॐ साईश्वर) आरुषी गुप्ता (शिवनेरी)
उत्कृष्ट संरक्षक – साई गुरव (श्री समर्थ) खुशी यादव (श्री समर्थ)
उत्कृष्ट आक्रमक – ॐ ननावरे (सरस्वती) गार्गी काडगे (शिवनेरी)
Post a Comment
0 Comments