हर्षला सकपाळ व साई गुरव यांच्याकडे
मुंबईच्या खो-खो संघाची धुरा
५२ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व
निवड चाचणी स्पर्धेसाठी मुंबईचे संघ जाहीर
यंदा दमदार कामगिरीची अपेक्षा
मुंबई : सोलापूर येथे मंगळवारपासून
सुरू होत असलेल्या ५२ व्या कुमार-मुली (१८ वर्षांखालील)
महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी मुंबई खो-खो संघटनेने आपले
कुमार व मुली गटाचे संघ जाहीर केले आहेत. यंदाच्या स्पर्धेत मुलींच्या संघाच्या
कर्णधारपदी हर्षला सकपाळ, तर कुमार संघाच्या कर्णधारपदी साई गुरव यांची निवड करण्यात आली
आहे.
सोलापुरात रंगणार राज्यातील खो-खोचा
महाकुंभ
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने
आणि सोलापूर ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने किरण स्पोर्ट्स, सोलापूर यांच्या विद्यमाने
आयोजित ही स्पर्धा २ ते ५ जून २०२६ या कालावधीत शासकीय मैदान, नेहरूनगर, विजापूर रोड, सोलापूर येथे रंगणार आहे. राज्यातील
बलाढ्य जिल्हा संघांबरोबरच मुंबईचे संघही विजेतेपदाच्या शर्यतीत आपली छाप
पाडण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहेत.
हर्षला सकपाळच्या नेतृत्वाखाली मुलींचा
संघ सज्ज
मुंबईच्या मुलींच्या संघात आरुषी गुप्ता, गार्गी काडगे, सिद्धी शिंदे, मुस्कान शेख (सर्व शिवनेरी सेवा मंडळ), सानिका शिर्के, सोनम शेलार, खुशी यादव (सर्व श्री समर्थ व्यायाम
मंदिर), यशस्वी कदम, निर्मिती परब (सर्व ॐ साईश्वर सेवा मंडळ), अवनी पाटील, जिज्ञासा गायकवाड (ॐ समर्थ भारत व्यायाम
मंदिर), दक्षता घोलप (आर्य सेना), हर्षला सकपाळ
(कर्णधार) (सरस्वती स्पोर्ट्स क्लब), मुग्धा देवळेकर (वैभव स्पोर्ट्स क्लब) आणि प्रांजल पाताडे (अमर हिंद मंडळ) यांचा
समावेश आहे. संघाच्या प्रशिक्षकपदी संकेत डायमा, तर व्यवस्थापक म्हणून निशा पाटोळे जबाबदारी सांभाळणार आहेत.
साई गुरवकडे कुमार संघाचे नेतृत्व
कुमार गटात प्रशिक मोरे, अधिराज गुरव, निशाद ताम्हणकर, सार्थक माडीये (सर्व ॐ साईश्वर सेवा मंडळ), ओम ननावरे, ओमकार खरंगटे, वरुण गुप्ता (सर्व सरस्वती स्पोर्ट्स
क्लब), साईश शिंदे, साई गुरव (कर्णधार) (सर्व श्री समर्थ व्यायाम
मंदिर), ओमकार जाधव, अनोश कदम (सर्व विद्यार्थी क्रीडा
केंद्र), राहुल नेवरेकर, निहाल पंडित (सर्व वैभव स्पोर्ट्स क्लब), विघ्नेश कोरे (अमर हिंद मंडळ) आणि हर्षल पानसरे (ॐ समर्थ भारत व्यायाम
मंदिर) यांचा समावेश करण्यात आला आहे. संघाचे प्रशिक्षक गुरुदत्त शिंदे, तर व्यवस्थापक आदेश कागडा हे असतील.
मुंबईच्या संघांकडून यंदा मोठ्या अपेक्षा
गेल्या काही वर्षांत राज्य अजिंक्यपद
स्पर्धेत मुंबईच्या संघांना अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. मात्र यंदा अनुभवी
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, गुणवंत खेळाडूंचा समतोल संघ आणि विविध नामांकित संस्थांतील खेळाडूंचा समावेश
पाहता मुंबईच्या दोन्ही संघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य संघ निवडीची संधी असल्याने प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम खेळ करण्यासाठी सज्ज
असून मुंबईच्या खो-खो वर्तुळात यंदाच्या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली
आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments