'गोल्डन गर्ल' तारिणी सुरीचा जीएमबीएकडून भव्य सत्कार
जागतिक कनिष्ठ मिश्र सांघिक स्पर्धेतील ऐतिहासिक
कांस्यपदकासाठी सन्मानचिन्ह आणि ₹२५ हजारांचे रोख पारितोषिक प्रदान
मुंबईच्या सुवर्णकन्येच्या यशाला मानाचा मुजरा
मुंबई : जागतिक स्तरावर भारतीय बॅडमिंटनचा झेंडा अभिमानाने
फडकावणारी आणि मुंबईची 'गोल्डन गर्ल' म्हणून ओळख निर्माण करणारी तारिणी सुरी हिचा ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) तर्फे नुकताच
भव्य सत्कार करण्यात आला. तिच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करत असोसिएशनतर्फे तिला सन्मानचिन्ह आणि ₹२५ हजारांचे रोख पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.
२५ वर्षांनंतर भारताला मिळवून दिले ऐतिहासिक पदक
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गुवाहाटी येथे झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक कनिष्ठ मिश्र सांघिक
स्पर्धेत (सुहंदिनाता कप) भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियावर
मात करत ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, २५ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत पदक
जिंकण्याचा मान मिळाला आणि त्या ऐतिहासिक भारतीय संघात तारिणी सुरी हिचा
महत्त्वपूर्ण समावेश होता.
देशांतर्गत ते आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार
वाटचाल
तारिणी सुरी हिने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील
विविध बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःची
स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि स्पर्धात्मक वृत्तीच्या
जोरावर तिने यशाची अनेक शिखरे गाठली आहेत.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घडली नवी तारा
प्रख्यात प्रशिक्षक आणि माजी भारतीय खेळाडूंच्या
मार्गदर्शनाखाली तारिणी सुरी हिने आपल्या खेळामध्ये सातत्याने प्रगती करत
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी छाप पाडली आहे. तिची जिद्द, मेहनत आणि समर्पण यामुळे ती भारतीय बॅडमिंटनमधील
भविष्यातील आशादायी खेळाडू म्हणून उदयास आली आहे.

Post a Comment
0 Comments