नाशिकचा
भाग्य धवन ठरला जागतिक विजेता!
दक्षिण
आफ्रिकेतील जागतिक क्लासिक पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत +१२० किलो सब-ज्युनिअर
गटात सुवर्णमय कामगिरी
स्क्वॅट
व डेडलिफ्टमध्ये सुवर्ण, एकूण ६२७.५ किलो वजन
उचलून विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब
भाग्याची
सुवर्णभरारी; नाशिकसह महाराष्ट्राचा
झेंडा जगाच्या व्यासपीठावर
नाशिक
: अवघ्या वयात ताकदीच्या खेळात जगाला दखल
घ्यायला लावणारी कामगिरी करत नाशिकचा कु. भाग्य धवन याने महाराष्ट्राच्या
शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. २० ते २९ ऑगस्ट २०२६ दरम्यान सन सिटी,
दक्षिण आफ्रिका येथे सुरू
असलेल्या जागतिक क्लासिक पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत भाग्यने +१२० किलो सब-ज्युनिअर गटात विश्वविजेतेपद
पटकावत सुवर्णमय कामगिरी केली. स्क्वॅटमध्ये २२० किलो आणि डेडलिफ्टमध्ये
तब्बल २५५ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या भाग्यने एकूण ६२७.५
किलो वजनाची कामगिरी नोंदवत संपूर्ण पॉवरलिफ्टिंगमध्येही सुवर्णपदक पटकावले.
स्क्वॅटमध्ये
२२० किलोचा दमदार झटका
स्पर्धेतील
स्क्वॅट प्रकारात भाग्य धवनने तब्बल २२० किलो वजन उचलत
प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि सुवर्णपदक पटकावले. ताकद,
तंत्र आणि आत्मविश्वासाचा अचूक मेळ साधत त्याने पहिल्याच प्रकारात
महाराष्ट्राचा दबदबा निर्माण केला.
बेंच
प्रेसमध्ये रौप्याची कमाई
बेंच
प्रेसमध्येही भाग्यने आपल्या कामगिरीची धार कायम ठेवत १५२.५ किलो वजन उचलले.
या कामगिरीच्या जोरावर त्याने रौप्यपदक मिळवले. तीनही प्रकारांत
सातत्यपूर्ण कामगिरी करण्याच्या दिशेने ही कामगिरी निर्णायक ठरली.
डेडलिफ्टमध्ये
२५५ किलो; पुन्हा सुवर्ण
डेडलिफ्टच्या
अंतिम प्रकारात भाग्यने ताकदीची अक्षरशः परिसीमा गाठत २५५ किलो वजन उचलले
आणि पुन्हा एकदा सुवर्णपदकावर झडप घातली. दोन प्रकारांत सुवर्ण आणि एका
प्रकारात रौप्य अशी दमदार कामगिरी करत त्याने एकूण विजेतेपदासाठी आपली दावेदारी
पक्की केली.
६२७.५
किलो वजन; संपूर्ण स्पर्धेत
सुवर्णमुद्रा
स्क्वॅट
२२० किलो, बेंच प्रेस १५२.५ किलो
आणि डेडलिफ्ट २५५ किलो, अशी एकत्रित ६२७.५ किलो
वजनाची कामगिरी नोंदवत भाग्य धवनने संपूर्ण पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
पटकावले. या कामगिरीमुळे तो जागतिक विजेता ठरला असून, नाशिकच्या पॉवरलिफ्टिंगच्या इतिहासात या यशाची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली
आहे.
नाशिकचा
अभिमान, महाराष्ट्राची मान उंचावली
भाग्य
धवनच्या या विश्वविजेतेपदामुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव जागतिक
पॉवरलिफ्टिंगच्या नकाशावर ठळकपणे उमटले आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिरंगा
उंचावत केलेली ही कामगिरी महाराष्ट्रातील युवा पॉवरलिफ्टर्ससाठी निश्चितच
प्रेरणादायी ठरणार आहे.
आई-वडील,
मार्गदर्शक आणि संघटनेचे योगदान
भाग्यच्या
या ऐतिहासिक यशामागे त्याचे आई-वडील, मार्गदर्शक
आणि नाशिक जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन
यांचे मोलाचे योगदान आहे. त्याच्या या शानदार विश्वविजेतेपदाबद्दल महाराष्ट्र
स्टेट पॉवरलिफ्टिंग कुटुंबीयांतर्फे भाग्य धवन,
त्याचे आई-वडील, मार्गदर्शक आणि नाशिक जिल्हा
पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे हार्दिक अभिनंदन
करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments