Type Here to Get Search Results !

सारस्वत ब्राह्मण समाज राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला सज्ज मुंबई चर्नी रोडवर २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान रंगणार राज्यस्तरीय कॅरमचा थरार; विजेत्यांवर १ लाख १० हजारांच्या रोख पारितोषिकांची बरसात राज्य मानांकन स्पर्धेचे आयोजन


सारस्वत ब्राह्मण समाज राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला सज्ज मुंबई

चर्नी रोडवर २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान रंगणार राज्यस्तरीय कॅरमचा थरार; विजेत्यांवर १ लाख १० हजारांच्या रोख पारितोषिकांची बरसात

राज्य मानांकन स्पर्धेचे आयोजन

 

मुंबई : कॅरमच्या राज्यस्तरीय हंगामाला पुन्हा एकदा मुंबईत रंगत चढणार असून सारस्वत ब्राह्मण समाज, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने २ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा २ गटांत रंगणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील आघाडीचे कॅरमपटू आपल्या कौशल्याची परीक्षा देणार आहेत.

 

चर्नी रोडवर वातानुकूलित सभागृहात सामने

स्पर्धेतील सर्व सामने शांती निवास वातानुकूलित हॉल, ३१/सी, महर्षी कर्वे रोड, चर्नी रोड स्टेशन (पश्चिम) समोर, मुंबई – ४००००४ येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यामुळे कॅरम रसिकांना दर्जेदार आणि चुरशीच्या राज्य मानांकन सामन्यांचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

 

विजेत्यांसाठी भरीव पारितोषिके

स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांनी भरीव पारितोषिकांची घोषणा केली असून एकंदर १ लाख १० हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक खेळाडूंनी आपली नावे आपल्या जिल्हा कॅरम संघटनेमार्फत नोंदवावीत. मुंबईतील खेळाडूंनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी चौक जवळ, शिवाजी पार्क, मुंबई – ४०००१६ येथे प्रवेश नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments