मुंबई
महापौर चषक मोफत शालेय कॅरम स्पर्धा २६ सप्टेंबरपासून दादरमध्ये रंगणार!
एमएससी
बँकेच्या प्रायोजकत्वातून शालेय कॅरमपटूंना मोठे व्यासपीठ इच्छुक खेळाडूंसाठी मोफत
मार्गदर्शन उपक्रमालाही ७ सप्टेंबरपासून सुरुवात
मुंबई
: शालेय कॅरमपटूंच्या बोटांना आता पुन्हा
मिळणार कॅरम बोर्डवर कौशल्य दाखविण्याची संधी! आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य
सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची मोफत एकेरी
कॅरम स्पर्धा २६ सप्टेंबरपासून दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज
युनियन सभागृहात रंगणार आहे. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ
आणि मुंबई महापौर रितू तावडे यांच्या सहकार्यामुळे शालेय खेळाडूंसाठी ही
स्पर्धा पूर्णपणे विनाशुल्क ठेवण्यात आली आहे.
२०१८
च्या प्रतिसादानंतर पुन्हा ‘महापौर चषक’
मुंबई
महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेला २०१८ मध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त
प्रतिसादामुळे शालेय कॅरम क्षेत्रात या स्पर्धेची वेगळी ओळख निर्माण झाली
होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे काही काळ खंडित झालेली ही स्पर्धा पुन्हा सुरू
करण्यासाठी आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या
प्रयत्नांना यंदा यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विध्याधर
अनास्कर यांनीही या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे.
स्पर्धेआधीच
मोफत सरावाची ‘फटकेबाजी’
शालेय
खेळाडूंचा कॅरमकडे वाढता कल लक्षात घेऊन संयोजकांनी स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी मोफत
मार्गदर्शनात्मक सराव उपक्रम सुरू केला आहे. इच्छुक शाळांमध्ये ७
सप्टेंबरपासून या उपक्रमाला प्रारंभ होणार असून चेंबूरनाका मनपा शाळेपासून त्याची
सुरुवात केली जाणार आहे. या उपक्रमामुळे नवोदित खेळाडूंना स्पर्धेपूर्वी तंत्र,
सराव आणि बोर्डवरील आत्मविश्वास वाढविण्याची संधी मिळणार आहे.
१६
वर्षांखालील खेळाडूंना विनाशुल्क प्रवेश
एमएससी
बँक-मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर
रोजी होणार असून इयत्ता १० वीपर्यंतच्या १६ वर्षांखालील शालेय मुला-मुलींसाठी
ही स्पर्धा विनाशुल्क खुली आहे. स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना
आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह विविध भागातील
शालेय कॅरमपटूंसाठी ही स्पर्धा आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी ठरणार आहे.
१०
सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची संधी
स्पर्धेत
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शालेय कॅरमपटूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी शिवछत्रपती
पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण (९८६९३ ५७७६३) अथवा प्रमोद पार्टे (९८६९०
६५२३९) यांच्याशी संपर्क साधावा. को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई
कार्यालय, स्टेट बँकेच्या बाजूला,
भवानी शंकर रोड, दादर-पश्चिम, मुंबई ४०० ०२८ येथे १०
सप्टेंबरपर्यंत दररोज सायं. ६ ते ८.३० या वेळेत प्रवेशासाठी संपर्क करता येईल.

Post a Comment
0 Comments