करमरकर
अकॅडमीच्या शटलर्सचा मुंबई उपनगरात ‘सुवर्णधडाका’!
११
सुवर्ण, ८ रौप्यसह तब्बल १९ पदकांची घसघशीत कमाई
सोहम
फाटकची हॅटट्रिक
मुंबई
: गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या कोर्टवर
बॅडमिंटनच्या शटलचा वेग आणि करमरकर अकॅडमीच्या खेळाडूंच्या विजयाची गती यांचा
जबरदस्त संगम पाहायला मिळाला. सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीच्या (एसकेबीए) खेळाडूंनी
मुंबई उपनगर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत तब्बल ११ सुवर्ण आणि ८ रौप्य अशी १९
पदकांची घसघशीत कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
सोहम
फाटकचा सुवर्णवार
अकॅडमीच्या
या पदकवर्षावात सोहम फाटकने तब्बल ३ सुवर्णपदके जिंकत सर्वाधिक प्रभावी
कामगिरी केली. त्याचबरोबर मानसी कारेकर आणि प्रथिन मणिहर यांनी प्रत्येकी २
सुवर्णपदके पटकावत आपल्या खेळाची ताकद दाखवून दिली. अनिका तनेजा,
प्रित कौर आणि सुश्रुत करमरकर
यांनी प्रत्येकी १ सुवर्णपदक जिंकून अकॅडमीच्या सुवर्णमोहिमेत भर घातली.
रिषभची
सुवर्णासह रौप्याची कमाई
रिषभ
गजवाणी यानेही अष्टपैलू कामगिरी करत १
सुवर्ण आणि १ रौप्यपदक मिळवले. तर श्वेता ठाकुर हिला कडव्या लढतीनंतर ३
रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. नमिता मेहता,
अयान कुलकर्णी, मायरा गरोडिया आणि अद्रीत सिंग
यांनी प्रत्येकी १ रौप्यपदक जिंकत अकॅडमीच्या पदकसंख्येत मोलाची भर घातली.
जिल्हास्तरीय
स्पर्धेत एसकेबीएचा ठसा
गोरेगाव
स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या या स्पर्धेत एसकेबीएच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण आणि
आत्मविश्वासपूर्ण खेळ करत विविध गटांत आपली छाप पाडली. ११ सुवर्ण आणि ८ रौप्य
पदकांचा हा पदकवर्षाव अकॅडमीतील प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या
मेहनतीची ठोस पावती ठरली आहे.
शहाजीराजे
क्रीडा संकुलात घडतेय नवी शटल फळी
मुंबई
महानगरपालिकेच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात
सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंना नियमित बॅडमिंटन
प्रशिक्षण दिले जाते. याच प्रशिक्षणातून तयार झालेल्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय
स्पर्धेत दमदार कामगिरी करत एसकेबीएचे नाव पदकांच्या यादीत ठळकपणे नोंदवले आहे.

Post a Comment
0 Comments