महाराष्ट्र
बॅडमिंटनच्या नव्या पर्वाला सुरुवात!
अरुण
लखानी अध्यक्षपदी, सिद्धार्थ पाटील मानद
सरचिटणीसपदी बिनविरोध
मुंबईचे
सचिन भारती मानद सहसचिव
नागपूर
: महाराष्ट्राच्या बॅडमिंटन प्रशासनात नव्या
पर्वाची दमदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए)
२०२६ ते २०३० या कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून विद्यमान
अध्यक्ष अरुण लखानी यांची पुन्हा अध्यक्षपदी, तर
अनुभवी संघटक सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी निवड झाली आहे. शिरीष
बोराळकर यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची, तर मंगेश
काशीकर यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई
शहराचे सचिव सचिन भारती यांची मानद सहसचिवपदी निवड झाली आहे.
सर्व
पदांसाठी एकच वैध अर्ज
मुंबई
उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा निवडणूक निर्णय अधिकारी न्यायमूर्ती
अरुण बी. चौधरी यांनी वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. सर्व पदांसाठी
प्रत्येकी एकच वैध अर्ज प्राप्त झाल्याने एमबीएची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध
झाली.
लखानींच्या
नेतृत्वाला पुन्हा पसंती
राज्यातील
बॅडमिंटनचा पाया मजबूत करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा
उभारण्यासाठी अरुण लखानी यांनी केलेले काम महत्त्वाचे ठरले आहे. नव्या
कार्यकारिणीत त्यांच्या सोबत शिरीष बोराळकर कार्याध्यक्ष आणि सिद्धार्थ
पाटील मानद सरचिटणीस म्हणून संघटनेची प्रमुख धुरा सांभाळणार आहेत. मंगेश
काशीकर यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.
युवा
चेहऱ्यांना संधी
नव्या
कार्यकारिणीत युवा पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे
ग्रामीण आणि निमशहरी भागातील खेळाडूंना अधिक संधी, स्पर्धांचे
प्रभावी नियोजन आणि जिल्हा संघटनांचे बळकटीकरण याला आगामी काळात गती मिळण्याची
अपेक्षा आहे.
सचिन
भारतींसह सहा उपाध्यक्ष
उपाध्यक्षपदी
वृषालीराजे शिवाजीराजे भोसले (सातारा), पंकज
ठाकूर (पालघर), ओंकार हजारे (रत्नागिरी), परेश ठाकूर (रायगड), जोवेल चांदेकर (चंद्रपूर)
आणि विजय पळसकर (बुलढाणा) यांची निवड झाली आहे. प्रसाद गोखले यांची
मानद स्पर्धा सचिव, आनंद जोशी यांची मानद प्रशिक्षण व विकास सचिव, जगदीश जोशी यांची मानद कोषाध्यक्ष आणि सचिन भारती यांची मानद सहसचिव म्हणून
बिनविरोध निवड झाली.
११
सदस्यीय नियामक मंडळ
नियामक
मंडळात राज्यातील विविध जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. महेश
वाक्रडकर (नांदेड), पराग
एकंडे (नाशिक), मिलिंद कुलकर्णी (अहिल्यानगर), दिनेश पाटील (धुळे), समीर पाटणकर (बामू), विनीत जोशी (जळगाव), नागोजी चिलकरवार (जालना),
दिनेश धूत (अकोला), साईदास खानगव (कोल्हापूर),
स्नेहा विंदा फैजपूरकर (नागपूर)
आणि मुकेश नागपुरे (गडचिरोली) यांचा त्यात समावेश आहे.
२०२६
ते २०३०ची नवी टीम
अध्यक्ष
: अरुण लखानी (नागपूर); कार्याध्यक्ष
: शिरीष बोराळकर (छत्रपती संभाजीनगर); वरिष्ठ उपाध्यक्ष :
मंगेश काशीकर (नागपूर); मानद सरचिटणीस : सिद्धार्थ पाटील
(छत्रपती संभाजीनगर); उपाध्यक्ष : वृषालीराजे शिवाजीराजे
भोसले, पंकज ठाकूर, ओंकार हजारे,
परेश ठाकूर, जोवेल चांदेकर, विजय पळसकर; मानद स्पर्धा सचिव : प्रसाद गोखले;
मानद प्रशिक्षण व विकास सचिव : आनंद जोशी; मानद
कोषाध्यक्ष : जगदीश जोशी; मानद सहसचिव : सचिन भारती.
राज्याच्या
बॅडमिंटनला नवी दिशा
अनुभव
आणि युवा नेतृत्वाचा मेळ असलेल्या या नव्या कार्यकारिणीकडून महाराष्ट्रातील
बॅडमिंटनचा विस्तार, जिल्हास्तरीय
संघटनांचे बळकटीकरण, खेळाडू विकास आणि स्पर्धात्मक संधी
वाढवण्यावर भर राहण्याची अपेक्षा आहे.
विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधित्वामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील बॅडमिंटनला
संघटनात्मक व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे.
.jpeg)

Post a Comment
0 Comments