बीओबी
बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड
प्रथम
पुरुष
गटात सरस सरासरीवर तामोजीची बाजी
महिलांमध्ये
अमृता लाडने देवी शांतीला मागे टाकले
मुंबई
: बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागातर्फे आणि आयडियल
स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने आयोजित मुंबई विभागीय बीओबी निवड चाचणी बुद्धिबळ
स्पर्धेत पुरुष गटात तामोजी चक्रवर्ती, तर
महिला गटात अमृता लाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. निर्णायक फेरीतील
चुरशीच्या लढतींमध्ये बरोबरीचे निकाल लागल्याने सरस सरासरीच्या आधारे विजेते
निश्चित झाले.
तामोजी
चक्रवर्तीची निर्णायक पटावर बाजी
बॅलार्ड
पियर येथील बीओबी क्रीडा गृहात झालेल्या पुरुष गटातील पाचव्या आणि निर्णायक साखळी
फेरीत पहिल्या पटावर तामोजी चक्रवर्ती आणि विकास महाडिक यांच्यात रंगतदार
लढत झाली. विकासच्या आक्रमक आणि लढवय्या चालींना तामोजीने तोडीस तोड प्रत्युत्तर
दिले. अखेर २३व्या चालीला हा सामना बरोबरीत सुटला. दोघांनीही प्रत्येकी ४.५ गुण
मिळविले; मात्र सरस सरासरीच्या आधारे
तामोजीने प्रथम, तर विकासने द्वितीय क्रमांक मिळविला.
अनिकेत
सकपाळची तिसऱ्या स्थानावर झेप
पुरुष
गटातील दुसऱ्या पटावरील सामन्यात अनिकेत सकपाळने संकेत साकरेच्या राजाला २८व्या
चालीला जेरीस आणत विजय मिळविला. या महत्त्वपूर्ण विजयासह अनिकेतने साखळीत ४
गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
अमृता
लाडची सरस सरासरीवर आघाडी
महिला
गटातील निर्णायक सामन्यात पहिल्या पटावर अमृता लाड आणि देवी शांती यांच्यातील
लढत १४ चालींमध्ये बरोबरीत संपली. दोघींनीही प्रत्येकी २.५ गुण मिळविले.
मात्र, सरस सरासरीच्या आधारे अमृता लाडने प्रथम,
तर देवी शांतीने द्वितीय क्रमांक मिळविला.
इंदिरा
राणेची आक्रमक खेळी
महिला
गटातील अन्य सामन्यात इंदिरा राणेने आक्रमक चाली रचत नवेजीता गुलेरीला पराभूत
केले. या विजयाच्या जोरावर इंदिराने साखळीत २ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
मान्यवरांकडून
विजेत्यांचे अभिनंदन
स्पर्धेतील
विजेत्यांचे मुंबई विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक सागर आर.,
क्रीडा संयोजक प्रदीप सुरोशे, मुंबई
शहर बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजाबाबू गजेंगी आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेते
लीलाधर चव्हाण यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments