एलआयसी-महापौर
शालेय बुद्धिबळात कार्तिकेय सावंत, साध्या
सावंत गटविजेते!
कार्तिकेयची
सरस सरासरीवर बाजी
साध्या
सावंतची ५ पैकी ५ विजयांसह निर्विवाद घोडदौड
मुंबई
: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
(एलआयसी) पुरस्कृत एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या १२
वर्षांखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित कार्तिकेय सावंतने ४.५ गुणांसह,
तर ८ वर्षांखालील गटात साध्या सावंतने ५ गुणांसह गटविजेतेपद
पटकाविले. कार्तिकेयने निर्णायक फेरीतील चुरशीच्या लढतीनंतर सरस सरासरीच्या आधारे
बाजी मारली, तर साध्याने सर्व सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व
गाजविले.
कार्तिकेय
सावंतची सरस सरासरीवर बाजी
१२
वर्षांखालील गटातील निर्णायक पाचव्या साखळी फेरीत कार्तिकेय सावंत आणि मृण्मयी
डावरे यांच्यात विजेतेपदासाठी चुरस रंगली. दोघांनीही प्रत्येकी ४.५ गुण
मिळविले; मात्र सरस सरासरीच्या आधारे
कार्तिकेयने मृण्मयीला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्या कार्तिकेयला
आकर्षक चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
साध्या
सावंतची ५ पैकी ५ विजयांची कामगिरी
आयडियल
स्पोर्ट्स अकॅडमी व आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आरएमएमएसच्या वातानुकूलित
सभागृहात आयोजित स्पर्धेच्या ८ वर्षांखालील गटात साध्या सावंतने विजेतेपदासाठीचे
अटीतटीचे आव्हान समर्थपणे परतविले. अरिंजय भट्टाचार्जी,
एकम बाघला आणि इथन पिकार्डो
यांच्याविरुद्ध प्रभावी खेळ करीत साध्याने साखळीतील सर्व ५ सामने जिंकले आणि ५
गुणांसह निर्विवाद गटविजेतेपद मिळविले.
दोन्ही
गटांतील अव्वल पाच खेळाडू
८
वर्षांखालील गटात साध्या सावंतने ५ गुणांसह प्रथम,
अरिंजय भट्टाचार्जीने ४ गुणांसह द्वितीय, एकम बाघलाने ४ गुणांसह तृतीय, इथन पिकार्डोने
४ गुणांसह चतुर्थ, तर स्मित लोकेने ३.५ गुणांसह पाचवा
क्रमांक मिळविला.
१२
वर्षांखालील गटात कार्तिकेय सावंतने ४.५ गुणांसह प्रथम,
मृण्मयी डावरेने ४.५ गुणांसह द्वितीय, आयांश पाटीलने ४ गुणांसह तृतीय, नैतिक
पालकरने ४ गुणांसह चतुर्थ, तर सार्थ लोकेने ४ गुणांसह
पाचवा क्रमांक पटकाविला.
मान्यवरांच्या
उपस्थितीत पुरस्कार वितरण
पारितोषिक
वितरण सोहळ्यात क्रीडापटू गोविंदराव मोहिते, एलआयसी
अधिकारी रमेश जोशी, क्रीडाप्रेमी निवृत्ती देसाई
व अण्णा शिर्सेकर, प्रशिक्षक राजाबाबू गजेंगी आणि
शिवछत्रपती पुरस्कारविजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक गटातील पहिल्या १५ खेळाडूंना आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात
आले. शालेय बुद्धिबळपटूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या
उपक्रमाला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment
0 Comments