सुवर्णमहोत्सवी कुमार
व मुली राज्य अजिंक्यपद व निवड
चाचणी खो-खो स्पर्धा
सोलापूर, रत्नागिरीच्या दोन्ही संघाची विजयी सलामी
धाराशिव, जालना, सांगली, बीड,
नाशिक यांचेही विजय
धाराशिव, दि. २७ ऑक्टोबर, सोलापूर, रत्नागिरी व
नाशिक या संघाच्या कुमार व मुली संघाने सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य
अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेची विजयी सलामी दिली.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो
असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित केली आहे. रविवारी सुरू झालेल्या या
स्पर्धेत सलामीच्या दिवशी सर्व सामने एकतर्फी झाले. सोलापूरच्या मुलांनी जालन्यावर
२१-८ व मुलीनी बीडवर १७-५ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला. रत्नागिरीच्या
मुलांनी लातूरचा १७-७ व मुलींनी नांदेडचा १९-६ असा एक डावाने धुव्वा उडवला.
नाशिकच्या मुलांनी हिंगोलीला २६-४ तर मुलींनी नंदुरबारला २०-४ असे एका डावाने
नमवले.
मुलींच्या गटात धाराशिव, जालना व मुलांच्या गटात सांगली,
बीड यांनीही प्रतिस्पर्धी
संघावर शानदार विजय मिळविले.
----------
आज चमकलेले खेळाडू :
कुमार :
अहिल्यानगर (मच्छिंद्र वाघमारे, (३.१० मिनिटे संरक्षण व ६ गुण), रत्नागिरी (आशिष
बालाडे ६ व ३ मिनिटे नाबाद),बीड (अभिषेक हिवाळे ३.५० मि. व २
गुण), सांगली (प्रेम दळवी१ मि.नाबाद व ८ गुण), सोलापूर (कृष्णा बनसोडे २.३५मि. व ३ गुण), (शुभम
चव्हाण, ३ मि. नाबाद व २ गुण).
मुली : सोलापूर (समृद्धी सुरवसे ४.२०मि.), (अनुष्का पवार, ५ गुण), रत्नागिरी (मृण्मयी नागवेकर ४.२० मि.),
(युवा पालवे, ५ गुण) नाशिक (तेजल सहारे,
५.१० मि. व ५ गुण), धाराशिव (अश्विनी शिंदे,
३मि. व ४ गुण), प्रणाली काळे (१.३० नाबाद ,
३.३० व २ गुण).
-------
अन्य निकाल : कुमार : अहिल्यानगर विजयी विरुद्ध
नांदेड २२-८ एक डावाने, बीड
विजयी विरुद्ध परभणी १२-११ (७.३० मिनिटे राखून), सांगली
विजयी विरुद्ध जळगाव २२-८ एक डावाने.
मुली : जालना विजयी विरुद्ध हिंगोली १२-२ एक डावाने, धाराशिव विजयी विरुद्ध परभणी १२-६ एक
डावाने, पालघर विजयी विरुद्ध जळगाव १२-५ एक डावाने.
.jpeg)
..jpeg)
Post a Comment
0 Comments